
दै चालु वार्ता वृत्तसेवा
मुंबई :2019-20 या वर्षात देशभरातील प्रादेशिक पक्षांमध्ये सर्वाधिक निवडणूक निधी शिवसेना पक्षाला राजकीय पक्षांना देणगी देण्यासाठी व्यक्ती, संस्था आणि संघटनांद्वारे निवडणूक निधी वापरले जातात.असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) च्या मते, शिवसेना, आप, द्रमुक आणि बिजू जनता दल यासह इतर प्रादेशिक पक्षांनी 2019-20 मध्ये 233.685 कोटी रुपयांच्या देणग्या प्राप्त केल्या आहेत. 2019-20 या वर्षात देशभरातील प्रादेशिक पक्षांमध्ये सर्वाधिक निवडणूक निधी शिवसेना पक्षाला मिळाला आहे. देशात सर्वाधिक निवडणूक निधी मिळालेल्या प्रादेशिक पक्षांमध्ये शिवसेना पहिल्या क्रमांकावर आहे. त्यामुळे शिवसेनेला अच्छे दिन आल्याचं म्हणावं लागेल.
2019-20 या काळात प्रादेशिक पक्षांना 6 हजार 923 डोनेशन्समधून 233.686 कोटी रुपये निधी मिळाला त्यातील सर्वाधिक 62.859 कोटी रुपये शिवसेनेला मिळाला. ही रक्कम 436 दानांमधून आली होती. त्या खालोखाल अण्णाद्रमुकला 52.17 कोटी, आम आदमी पक्षाला 37.37 कोटी, बिजू जनता दलला 28.20 कोटी तर वायएसआर काँग्रेसला 8.924 कोटी रुपये मिळाले. ADR (असोशिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म) या संस्थेच्या अहवालातील माहिती. 20 हजार रुपयांपेक्षा जास्त निवडणूक दान/निधी/डोनेशन मिळालं तर त्याची माहिती निवडणूक आयोगाला द्यावी लागते. त्याआधारावर एडीआर यांनी ही माहिती प्रसारित केली आहे.