
दैनिक चालू वार्ता शिराढोण प्रतिनिधी -लक्ष्मण कांबळे
लोहा तालुक्यातील हिंदोळा येथे एका १५ वर्षीय मुलीने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
लोहा तालुक्यातील हिंदोळा येथील संघमित्रा संभाजी सोनकांबळे या पंधरा वर्षीय मुलीने आपल्या राहत्या घरी फॅनच्या हुकाला सुती दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना दि.२५ रोजी सकाळी १० च्या सुमारास घडली. तिच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. उस्माननगर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक प्रभु केंद्रे यांच्यासह अन्य सहकार्याने पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कापसी बुद्रुक येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मृतदेह पाठविण्यात आला. वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आर के मुनेश्वर यांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन केला.दिनांक 25 रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास हिंदोळा येथील समशानभूमीत तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.सपोनि भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पि.के .केंद्रे हे तपास करीत आहेत.