
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर -संतोष मंनधरणे
देगलूर: 27/09/2022 या वेळी बी.के. विद्या बहेन्जि देगलुर सेवा केंद्र संचालिका , नाना मोरे चन्द्रकांत राष्ट्रवादी कॉंग्रेस नेते देगलुर , डॉ. सुनील जाधव संभाजी ब्रिगेड शहर उपाध्यक्ष देगलुर , मुख्याध्यापक मारकवाड आर .आय. मनोज पाटील , दत्ता मोरे , पपु पाटील,नागनाथ सावितरे , सहशिक्षक देशमुख जे एस , मुंगळें एन एस , वट्टमवार ए ए , आग्रे एस ई , राठोड , भंगे एन डी स्वयंपाकी रमेश महाराज उपस्थित होते ………सुरुवातीला डॉ सुनील जाधव यांनी सुबह सवेरे लेकर तेरा नाम प्रभु प्रार्थना सादर केली . नाना मोरे यांनी मी याच शाळेत शिकुन मोठा झालो व समाज तसेच राज कारणात चांगले कार्य करत आहे शाळा , गावा बद्दल चांगले कार्य करत राहणे माझे कर्तव्य आहे हे सांगुन शाळेत मुलांना चांगल्या सवयी बद्दल मार्ग दर्शन केले .विद्या बहेन्जि यांनी मुलांना नैतिक मूल्य , दैवी गुण आचरणात आणुन जगाला सुंदर, प्रगत , शक्तिशालि कस बनवता येईल व मोबाईल व इतर व्यसना बद्द्ल अवगत करून त्यांच्या पासुन दुर राहुन आध्यात्मिक उन्नती कशी करता येईल , झाडे ही कशी जीवनदायी आहेत याचे प्रबोधन केली .या नन्तर डॉ. सुनील जाधव यांनी मुले ही देशाचे भविष्य म्हणुन त्यांना वैद्यकीय द्रुष्टीनी मोबाईल सह व्यसनाचे दुष्परिणाम, उपाय बद्द्ल सांगुन इन्साफ की डगर पे बचौ दिखाओ चल्के ये देश है तुम्हारा नेता तुम्हीं कल के गीत गाऊन सांगितले . व्रुक्ष लावणे जतन करने ही काळाची गरज आहे या बद्द्ल सांगितले . या वेळी व्रुक्षा रोपण केले व मुलांनी जतन करू असे सांगितले . सूत्रसंचालन मु. अ. मारकवाड तर आभार मुंगले सर यांनी व्यक्त केले .