दैनिक चालू वार्ता कंधार प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
नांदेड:- दि.३०/०९/२०२२ रोजी जिल्हा परिषद हायस्कूल वाघी. ता. जि. नांदेड येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा व पालक मेळावा आयोजित करण्यात आला आहे. जिल्हा परिषद हायस्कूल वाघी येथील मुख्याध्यापक बादशाह सर यांनी पास्तविक केले आहे
या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून माझी मंत्री मा.डी. पी. सावंत साहेब यांची उपस्थिती होते. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून नांदेड उत्तरचे आमदार बालाजीराव कल्याणकर साहेब आले असताना यांनी व्यासपीठावर संबोधित करताना म्हणाले जिल्हा परिषद हायस्कूल वाघी येथे 10 लाख रुपये निधी देन्याचे आश्वासन दिले आहे . आमदार या कार्यक्रमाचे अध्यक्ष बालाजीराव कल्याणकर यांनी शाळेतील विविध समस्या जाणून घेऊन शाळेला काहीही कमी पडू दणार नाही व मान्यवरांच्या उपस्थिती I T I मध्ये भारत देशात पहिला आलेला जि.प.हा.वाघी येथील विद्यार्थी शुभम रामचंद्र आदमाने यांचाही सत्कार करण्यात आला आहे. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा व पालक मेळावा यांचे आयोजन जिल्हा परिषद हायस्कूल वाघी शिक्षक संच व समस्त गावकरी मंडळी वाघी यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन जिल्हा परिषद हायस्कूल वाघी येथील शेळगे सर यांनी केले. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून साहेबराव धनगे, संतोष क्षीरसागर, प्रदीप गुब्रे, विठ्ठल पाटील डक, देवीदासराव सरोदे, अमोल कदम,व लिंबगाव सर्कल मधील पदधीकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते व सर्व आजुबाजुच्या गावातील सरपंच वाघी गावचे सरपंच गणपतराव राठोड व वाघी गावचे सर्व ग्रामपंचायत सदस्य व पालक मंडळी उपस्थिती होती. जिल्हा परिषद हायस्कूल वाघी येथील शिकत असलेली आजूबाजूच्या गावातील गुणवंत विद्यार्थी व पालक मेळावा आयोजित करण्यात आला व शिक्षण समितीचे अध्यक्ष विठ्ठल गिरी महाराज उपाध्यक्ष कैलास हाके व शिक्षण समितीचे सर्व सदस्यांचा सत्कार आलेल्या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला या कार्यक्रमाचा शेवट पसायदान म्हणून करण्यात आला. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व मान्यवर व गावकरी मंडळी वाघी यांचे आभार कराळे सर आणि जिल्हा परिषद हायस्कूल वाघी येथील सर्व शिक्षक संच यांनी आभार मानले.
