
दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी-नवनाथ यादव
भूम : आरेवाडी येथील श्रीक्षेत्र बिरोबा देवस्थान येथे रविवारी ( दि . २ ) रोजी दुपारी दोन वाजता दसरा मेळावा आयोजित करण्यात आल्याची माहिती भाजपा नेते रणजित हापटे यांनी दिली.एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारमुळे धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे.राज्य सरकारकडून लवकरच शेळ्या,मेंढ्यांचा विमा उतरविला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले . रणजित हापटे म्हणाले की , धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे.मागील अडीच वर्षात समाजाच्या एसटी आरक्षणाबाबत न्यायालयात सुनावणी झाली नाही.शिंदे – फडणवीस सरकार आल्यापासून गती आली आहे.आरक्षणाचा प्रश्न लवकरच मार्गी लागेल असा विश्वास आहे . राज्यात मेंढपाळांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे,परंतू चराऊ कुरणच शिल्लक राहिलेले नाही.मेंढ्या चरण्यावरुन मेंढपाळांना मारहाणीचे प्रकार घडत आहेत.आमदार गोपीचंद पडळकर यांची वनमंत्री यांच्याशी चर्चा झाली.चराऊ कुरणाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. गेल्या काही वर्षात शेळ्या – मेंढ्यांना सातत्याने रोगराईचा सामना करावा लागत असल्यामुळे मेंढपाळांना आर्थिक नुकसान सहन करावे लागते.सरकारच्या माध्यमातून शेळया – मेंढ्यांचा विमा उतरवला जाणार आहे . त्यासाठी राज्य सरकारकडून १०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार असून,शेळी , मेंढी विकास महामंडळासह अनेक महामंडळाच्या अध्यक्षांच्या निवडी महाविकास आघाडी सरकारच्या कालावधीत झालेल्या नाहीत.या निवडी आता लवकरच होतील , असा विश्वास देखील रणजित हापटे यांनी व्यक्त केला .गेली तीन वर्षे कोरोनाच्या साथीमुळे दसरा मेळावा घेता आलेला नाही. त्यामुळे आरेवाडीमध्ये २ ऑक्टोंबरला दसरा मेळावा घेतला जाणार आहे.तरी या दसरा मेळाव्याला भूम तालुक्यातील समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन त्यांनी केले.