
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
दि.30/09/2022 रोजी माहे सप्टेंबरचे केंद्रस्तरीय शिक्षण परिषद जि.प.उच्च प्राथमिक शाळा, डोल्हारी येथे घेण्यात आली. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. बाबुराव कदम तर प्रमुख पाहुणे म्हणून डोल्हारी येथील सरपंच प्रतिनिधी श्री.तुकाराम साहेबराव माने, उपसरपंच श्री.साहेबराव कदम व संकुल सिरंजनीचे केंद्रप्रमुख मा. श्री.दत्तात्रय धात्रक साहेब होते. सर्व मान्यवर उपस्थितांचे स्वागत डोल्हारीच्या चिमुकल्यांनी मंजुळ असे स्वागतगीत गाऊन केले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्रप्रमुख श्री.दत्तात्रय धात्रक साहेब यांनी केले. याप्रसंगी शिक्षण परिषदेतील प्रमुख सुलभकांनी काही महत्वपूर्ण विषयावर सखोल मार्गदर्शन केले. त्यात श्री, प्रशांत कोरेकलकर सरांनी विद्याप्रवेश, इयत्ता पहिली एकात्मिक व द्विभाषिक पाठ्यपुस्तक व आजादी का अमृत महोत्सव श्री. माधव गोणे यांनी Read to me app, Tejas प्रकल्प, श्री.सुहास अंबाड यांनी विद्यांजली पोर्टल, PGI या उपक्रमाबद्दल तर श्री.भीमराव केंद्रे यांनी माता पालक गट, एक भारत श्रेष्ठ भारत या नियोजित विविध विषयावर सखोल मार्गदर्शन केले.
तसेच आजच्या कार्यक्रमाचे औचित्य साधत केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेत केंद्रप्रमुख श्री. दत्तात्रय धात्रक साहेब यांच्या संकल्पनेतून 2015 पासून केंद्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांचा गौरव व्हावा व काम करणाऱ्या शिक्षकांच्या पाटीवर कौतुकाची थाप पडावी या उद्देशाने ज्या पुरस्काराची सुरूवात केली ती परंपरा अखंड राखत आज केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेत कोविड काळात व चालूवर्षात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांचा केंद्रस्तरीय “गुरूगौरव पुरस्कार” देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. त्यामध्ये 2021-22 मधील गुरूगौरव पुरस्कार प्राप्त शिक्षक श्री.गोविंद दासरवार (जि.प.प्राथ.शाळा,बोरगडी तांडा), श्रीमती. सिमाताई फुलारी (सिरंजनी), निता देशमुख (शेलोडा), मोहन चव्हाण (एकंबा), अविनाश रावते (डोल्हारी), चंद्रकांत खताळ (एकंबा), साईनाथ कवटिकवार (कोठा ज.) तर
सन 2022 – 23 मधील गुरूगौरव पुरस्कार प्राप्त शिक्षक श्री.दत्ता जालने सर ( जि.प.प्राथ.शाळा सिरपल्ली), सुनिल राठोड (डोल्हारी), राजकुमार होळगे (डोल्हारी), अनुसया कांबळे (सिरंजनी), बालाजी हंबर्डे (सिरंजनी), दत्ता पेंढारकर (बोरगडी), साहेबराव शिरगिरे (बोरगडी), रामदास जाधव (बोरगडी), या आदी मान्यवरांचा शाल, पुष्पहार व सन्मानपत्र देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी संकुल सिरंजनीचे शिक्षण विस्तार आधिकारी मा.श्री.अरूण पाटील साहेब यांनी शिक्षण परिषदेला भेट देऊन प्रशासकीय बाबी विषयी व विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीबद्दल सखोल मार्गदर्शन केले. सदर केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेस केंद्रातील सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षिका उपस्थित होते. या कार्यक्रमाचे उत्कृष्ट सुत्रसंचालन भीमराव केंद्रे सर यांनी केले तर आभार शाळेचे मुख्याध्यापक श्री. निलेश फुलेवार सरांनी मानले. व उत्कृष्ट सुरूची भोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली. सदर भोजनव्यवस्थचे सर्व नियोजन बालानंद तोटेवाड सरांनी केले. एकंदरीत केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेचे अतिशय उत्कृष्ट आयोजन व नियोजन जि.प. प्राथमिक शाळा, डोल्हारी यांनी केले आणि शिक्षण परिषद आनंदमय वातावरणात संपन्न झाली.