
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
बीकेसी मैदान येथे होणाऱ्या शिवसेनेच्या भव्य दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर या मैदानाला भेट देऊन सुरू असलेल्या तयारीचा आढावा घेतला.
=======================
वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने तसेच वंदनीय गुरुवर्य धर्मवीर आंनद दिघे साहेब यांच्या प्रेरणेतून हा भव्य दिव्य असा मेळावा पार पडणार असून त्यासाठीची सारी सज्जता आता केली जात आहे.
राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो शिवसैनिक या मेळाव्यासाठी येणार असून त्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी आज व्यक्तीशः या मैदानाला भेट देऊन कामाचा आढावा घेतला तसेच काही महत्वाच्या सूचना देखील केल्या.
आम्ही सारे विचारांचे वारसदार असून एका सच्चा हिंदुत्ववादी कडवट शिवसैनिकाचे मनोगत ऐकण्यासाठी बीकेसी मैदानावर आवर्जून या असे आवाहन यासमयी प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना केले.
याप्रसंगी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, आमदार प्रताप सरनाईक तसेच शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.