
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
(मोताळा/प्रतिनिधी):- सन २००२- २००३ साली वडिलांसोबत बुलढाणा-मलकापूर रोडवरील मोठ्या वडाच्या झाडाजवळ दिवसभर उन्हातान्हात गहू विकून १००० रु, जमवल्यानंतर
९०० रुची सेंकडहँड सायकल खरेदी करून झालेला आनंद आजच्या कारमध्ये सुद्धा नाही अशी प्रतिक्रीया सुनिल वाघ सर यांनी दिली. दि.२९ सप्टेंबर रोजी त्याच खरेदी केलेल्या सायकलने बुलढाणा ते जहागीरपूर असा ४५ किमीचा सायकलप्रवास शेलापूर मार्गे तळणी मध्ये येत असताना तळणी येथे छोटेखानी सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंचपती शेषराव बोदडे, माजी उपसरपंच बाळकृष्ण नाफडे, ग्रा.पं सदस्य किरण नाफडे, माजी सरपंच सोपान चव्हाण, मोताळा तालुका भाजप अनुसुचित जाती आघाडी अध्यक्ष बळीराम अंभोरे, सिताराम अंभोरे पेंटर, अनिकेत ब-हाटे, पत्रकार मिलिंद बोदडे, गणेश वाघ यांच्यासह आदी नागरिक उपस्थित होते. तसेच सरांचा सायकल प्रवास जहागीरपूर येथे पोहचल्यावर स्थानिक गावकऱ्यांनी व विद्यार्थ्यांनी सरांचे औक्षण करुन पुष्प गुच्छ देऊन मोठ्या उत्साहात सत्कार केला. सदरचा सायकल प्रवास सुमारे २ तास १५ मिनिटांत यशस्वीरीत्या पूर्ण केला. या प्रवासा मागचा नेमका उद्देश काय असा प्रश्न जेव्हा स्थानिक नागरिकांनी विचारला असता तेव्हा मी भावूक झालो. आणि आपसुकच त्यांच्या तोंडून शब्द बाहेर पडले ते म्हणजे आईला लहाणपणी दिलेला शब्द पाळण्यासाठी!
त्यांनी सांगीतले की
माझ्या वडिलांना मी शिक्षक व्हावे अशी तीव्र इच्छा होती. सन २०१० च्या CET मध्ये 143 गुण मिळवून सुद्धा मला नोकरी मिळाली नाही. परंतु नंतर पुढे जुलै २०१२ ला रिचेकींग चा निकाल लागला. आणि मला १४७ गुण मिळाले कट ऑफ १४४ वर असल्याने आता मला १००% नोकरी मिळणार या आनंदात बाबा भेटेल त्याला
मुलगा शिक्षक होणार असे सांगत होते. मात्र तो आनंद आजही आठवतो. मात्र नोकरी काही लवकर मिळाली नाही. अशातच परिस्थितीशी संघर्ष करणाऱ्या कुटुंबात दि.२९ सप्टेंबर २०१२ रोजी अनपेक्षित घटना घडून वडिल आणि भाऊ दोघांच्या आत्महत्या झाल्या. त्यातून आई आणि बहिणीला सावरण्यासाठी स्वत:हा सुनिल वाघ यांनी कष्टाची कास धरून वडिलांच्या आणि आईच्या हातून फितू कापून सुरु केलेल्या आयडिअल क्लासेस मध्ये मेहनत घेऊन कुटुंबाची घडी बसवली. जीवंतपणी वडिलांना मी शिक्षक झाले हे पाहता आले नाही याची खंत त्यांच्या मनाला सतत होती. आज वडिलांना वारुन १० वर्ष पूर्ण झाले, या निमित्याने औचित्य साधून व आईने जेव्हा शिक्षण पूर्ण झाल्यावर सायकल भंगारवाल्याला देऊन टाकू का असे विचारले होते. तेव्हा सरांनी आईला शब्द दिला होता की, मी जर शिक्षक होऊ शकलो तर तूला याच सायकल शाळेत जाऊन दाखविल. तो शब्द खरा ठरविण्यासाठी वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ बुलढाणा ते जहगीरपुर असा ४५ किमीचा सायकल प्रवास यशस्वीरित्या पूर्ण करून आपण दिलेला शब्द खरा करुन दाखविला आहे.