
दैनिक चालु वार्ता पुणे शहर-प्रतिनिधी : जब्बार मुलाणी
===================
पाटस : २ ऑक्टोबर २०२२
राष्ट्रपिता महात्मा गांधी तसेच देशाला जय जवान जय किसान चा नारा देणारे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधून आज दौंड तालुका प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने मासिक आढावा बैठक पक्षाचे तालुकाध्यक्ष श्री.रमेश शितोळे – देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पाटस येथे घेण्यात आली.
या वेळी श्री.नानासाहेब साखरे – अध्यक्ष दौंड तालुका वकील आघाडी दौंड तालुका
श्री. भरत पोपट मोरे – उपाध्यक्ष यूवा आघाडी दौंड तालुका
श्री. गणेश बापूराव वाघमारे – उपाध्यक्ष कामगार आघाडी दोंड तालुका
श्री.मुश्ताक जैलानी मुलाणी अध्यक्ष जिल्हा परीषद गट पाटस
या नविन पदाधिकाऱ्यांची नियुक्त्या करण्यात आल्या. पक्षाचे सरचिटणीस शैलेशजी शिपलकर ,माहिला आघाडीच्या अध्यक्षा शबाना मुलानी , पक्षाचे उपाध्यक्ष रफिकजी सय्यद , शंकर काळे सर , चिटणीस राहूलजी शेलार ,यूवा आघाडीचे अध्यक्ष राहूलजी दोरगे ,यांनी आपले मनोगत व्यक्त केले . सध्याच्या राजकीय उलथापालथी मुळे निर्माण झालेल्या नवीन राजकीय समिकरणांवर प्रकाश टाकला तसेच सध्या नव्याने निर्माण झालेल्या सामाजिक प्रश्नावर विचार मांडले.वाढत्या चोऱ्या,महिलांवरील अत्याचारांच्या घटना,अनधिकृत पणे राहणारे परिसरातील परप्रांतीय,गुऱ्हाळ घरावरील प्रदूषण व भेसळयुक्त गुळनिर्मी ती,ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांचे राजरोज रस्त्यावर होणारे पार्किंग त्यामुळे होणारे अपघात, त्यामुळे विद्यार्थी आणि सामान्यांना होणारा त्रास अश्या सामाजिक प्रश्नावर आवाज उठवण्यासाठी रणनीती आखण्यात आली.त्याचप्रमाणे माजी राज्यमंत्री बच्चू भाऊ कडू यांचा सामाजिक चळवळीचा वारसा पुढे नेऊन तालुका प्रमुख श्री.रमेश शितोळे _ देशमुख यांच्या मार्गदर्शनाने दौंड तालुक्यात पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी
गाव तेथे प्रहार शाखेचे नियोजन करण्यात येणार आहे.तालुक्यात सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या पक्ष कार्यालयाचे उद्घाटन श्री. बच्चू भाऊ कडू यांच्या हस्ते होणार आहे.त्यावेळी तालुक्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे रमेश शितोळे – देशमुख यांनी सांगितले.
========-==================
बैठकीस प्रहार दिव्यांग क्रांती संस्थेचे उपाध्यक्ष विजयजी आटोळे ,कामगार आघाडीचे सरचिटणीस तुषार ढवाण ,युवा आघाडीचे उपाध्यक्ष सुनिल जगताप रुपेश रोकडे, फिरोज शेख, महिला आघाडीच्या कार्याध्यक्ष रोहीणी ताई शितोळे,श्री.गणेश जगताप तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
======================