
दैनिक चालू वार्ता कंधार प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
लोहा:- लोहा तालुक्यातील ढाकणी येथील आंबेडकरी चळवळीचे नेते के.एल. ढाकणीकर यांनी खुप परीश्रमाने बहुजन समाजातील माता भगिनींना निराधार योजनेचा लाभ मिळवून दिला बघा,म्हणुण सांगायचे आणी काम मार्गी लावण्यासाठी जिवाचा आटा पिटा करणारा आणी कारेगाव जि.प.शाळेचे तत्कालीन मुख्याध्यापक
नरसिंगराव दरबारे गुरुजी यांचे घरी जाउन हाईत का दरबारे सर घरी आज जरा कार्यक्रमाला जायचं होतं. गुरुजी सोबत आसले की आम्हला बी लई मोठी ताकत येते बघा काम करायला आसे म्हणायचे व मला पण नेहमी सांगायचे आणी माझ्या सुध्दा घरी येऊन मला नेहमी भेटत होते व आंबेडकरी चळवळी विषयी चर्चा व मार्गदर्शन करत होते मला सुध्दा राजकीय धडे शिकवणारे व शासकीय पातळीवर गोरगरीबांचे कामे कशा पध्दतीने करावे असा हतखंडा शिकविणारे आंबेडकरी चळवळीतील लढवय्ये नेते के.एल ढाकणीकर …
आता हा आवाज कधीच ऐकायला भेटणार नाही..आता ही खंत कधीच ऐकायला भेटणार नाही, आणी बहुजनांची सत्ता आली असती हो पण आपण सारे विखुरलेले आहोत हो, आपण कधी एक होऊ ही येळच सांगल आसे के.एल.ढाकणीकर कारेगावचे तत्कालीन मुख्याध्यापक नरसिंगराव दरबारे सरांना नेहमी म्हणायचे।
पुरोगामी विचारांचा, फुले शाहू आंबेडकरांचा अनुयायी, तळागाळातील लोकांना आपला वाटणारा माणूस ,एक माननिय,आदरणीय व्यक्तिमत्त्व आंबेडकरी चळवळीतील नेते के.एल.ढाकणीकर यांचे नांदेड येथे आज दि 1 ऑक्टोबर 2022 ला निधन झाले. दीर्घ आजाराने आज त्यांची ज्योत मालवली.मृत्यू समयी त्यांचे वय 65 वर्ष होते.त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली,एक मुलगा आणी जावई असा परिवार आहे.
विजयनगर सिडको नांदेड येथील प्रबुद्ध बुध्दविहाराच्या निर्माणात त्यांचा मोलाचा वाटा होता.
आपल्या समाजातील लोकांना सरकारी योजनांचा फायदा व्हावा, त्यांची फसगत होऊ नये, त्यांना रोजगार मिळावा म्हणून सतत धडपणारा साधा माणूस।
रमाई आवास योजनेचाही बऱ्याच लोकांना फायदा घेऊन देणारे के.एल.ढाकणीकर आज आपल्यात नाहीत, हे सत्य स्वीकारने अवघड होत आहे.
या परिवर्तनवादी, पुरोगामी व्यक्तिमत्वास सदगती लाभो।
कुटुंबीयांना हे दुःख सहनकरण्याचे बळ तथागत भगवान गौतम बुद्धांचा धम्म देवो.अशी तथागतांच्या चरणी प्रार्थणा.
आंबेडकरी चळवळीतील लढवय्या नेते के. एल. ढाकणीकर यांना भावपुर्ण आदरांजली, भावपूर्ण श्रद्धांजली
▪️ अनिलदादा गायकवाड
मराठवाडा सदस्य
रिपब्लिकन सेना
▪️नरसिंगराव दरबारेग गुरुजी (सेवानिवृत्त मुख्याध्यापक)