
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
▪️ महिलांच्या वारंवार येत होत्या तक्रारी
——————————————-
अमरावती :- मोठ-मोठ्या कंपन्या आपले उत्पादन विकण्याकरिता मोठ-मोठ्या जाहिराती करीत असतात अशातच बडनेरा नविनवस्ती भागांमध्ये एका-एका विशिष्ट कंपनीमार्फत अंडरगारमेंट्सची जाहिरात करीत असताना त्यावर अश्लील चित्र असलेले बॅनर गेल्या पंधरा दिवसांपासून बडनेरा शहरांमध्ये महिलांच्या दृष्टीस पडत होते.अशातच त्या महिलांनी युवा स्वाभिमान पार्टीकडे वारंवार तक्रारी केल्यास तक्रारीला अनुसरून आज बडनेरा नविनवस्ती जयहिंद चौक येथे युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने आगळे-वेगळे आंदोलन करण्यात आले आमदार रवीभाऊ राणा व खासदार सौ.नवनीतजी राणा यांच्या मार्गदर्शनाखाली आज बडनेरा येथे युवा स्वाभिमान पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी थेट जाहिरात फलक दर्शवणाऱ्या खांबांवर चढून अश्लीलतेचे हे फलक फाडून काढले आणि युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने निषेध सुद्धा नोंदवण्यात आला कंपन्यांमार्फत अश्या अश्लील प्रकारचे बॅनर बडनेरा शहरामध्ये लावले असता युवा स्वाभिमान पार्टी याही पेक्षा मोठे आंदोलन करेल सोबतच कंपनीच्या जाहिरातीच्या अशा फलकांवर प्रशासनाने सुद्धा लक्ष देऊन त्यावर निर्बंध घातले पाहिजे असे आंदोलनकर्ते यांचे म्हणणे आहे.आंदोलनकर्त्यांमध्ये युवा स्वाभिमान पार्टीचे कार्याध्यक्ष अजय जयस्वाल,विलास वाडेकर,निल निखार,अमोल मिलके,शुभम माटे,कमृद्दिन कार्यकर्त्यांचा आदींचा सहभाग होता.