
दैनिक चालू वार्ता नांदेड प्रतिनीधी- प्रा.यानभुरे जयवंत सोपानराव
नांदेड – भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते , ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी तथा श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी कंधार चे संस्थापक व संचालक माजी खासदार तथा आमदार डॉ. भाई केशवरावजी धोंडगे साहेब यांच्यासोबत खंदे समर्थक व कट्टर कार्यकर्ते म्हणून तत्कालीन परिस्थितीमध्ये सतत सोबत राहिलेले तसेच अनेक आंदोलनात सहभागी झालेले , आणीबाणीच्या काळात अर्थातच १९७५ – ७६ च्या दरम्यान कारावास भोगलेले व श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी कंधारचे दीर्घकाळ अध्यक्ष म्हणून कर्तव्य पार पाडलेले तसेच कंधार नगर परिषदेचे पंधरा वर्षे नगराध्यक्ष म्हणून राहिलेले आणि संस्था उभारणीच्या काळात स्वतःचे मोठे योगदान देऊन संस्थेचे संस्थापक तथा संचालक ज्येष्ठ स्वातंत्र सेनानी माजी खासदार तथा आमदार भाई डॉ. केशवरावजी धोंडगे साहेब , संस्थेचे सचिव ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी माजी आमदार गुरुनाथरावजी कुरुडे साहेब वाडीकर साहेब , बोधगिरे साहेब , संभाजी केंद्रे साहेब यांच्यासह त्यावेळेस संस्था खंबीरपणे उभी टाकावी म्हणून वेगवेगळ्या शाळेत शिक्षक म्हणून कार्य करत असताना अतिशय उत्कृष्ट अध्यापन करणारे भाई राजेश्वरजी आंबटवाड यांच्या १५ व्या स्मृतिदिनानिमित्ताने श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय माणिक नगर व नवीन कौठा नांदेड येथे भाई राजेश्वरजी आंबटवाड यांच्या पवित्र पावन स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी भाई राजेश्वरजी आंबटवाड यांच्या प्रतिमेस शाळेचे उपमुख्याध्यापक डी.पी. कदम यांच्या हातून पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले तसेच उपप्राचार्य परशुराम येसलवाड , पर्यवेक्षक प्रा. माधव ब्याळे, माध्यमिकचे पर्यवेक्षक सदानंद नळगे , शिवराज पवळे , ज्येष्ठ प्रा. मुरलीधर घोरबांड , प्रा.वसंत राठोड , ज्येष्ठ सहशिक्षिका विजयाताई कुरुडे , क्रीडा शिक्षक सुशील कुरुडे , प्रा.यानभुरे जयवंत सोपानराव यांच्या शुभ हस्ते प्रतिमेचे पुष्प पूजन करण्यात आले व पवित्र पावन स्मृतीस अभिवादन करण्यात आले.
प्रसंगी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे श्री .प्रशांत कुरुडे , सहशिक्षक विजय पवार , श्री बालाजी निरपणे , प्रा. रूपाली कळसकर , प्रा.वैशाली दुलेवाड प्रा. तेजस्विनी कोंडेकर , प्रा. रत्नमाला नवघरे , प्रा. रेश्मा शेख . प्रा.कपिल सोनकांबळे , प्रा.निलेश मोरेश्वर इत्यादी सह माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माध्यमिकचे पर्यवेक्षक शिवराज पवळे यांनी केले.