
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :- दर्यापूर-अंजनगाव सुर्जी या दोन शहरांसोबत १५६ खेड्यांचा सुद्धा पाणी पुरवठा दोन दिवस बंद राहणार असल्याची माहिती उपविभागीय अभियंता श्री.विजय शेंडे यांनी दिली आहे.
दर्यापूर-अंजनगाव सुर्जी व १५६ गावे यांना पाणी पुरवठा करणारी ९०० मी.मी. व्यासाची जलवाहिनीवर गळती झाल्यामुळे दिनांक ४ व ५ ऑक्टोबर रोजी जलवाहिनेचे दुरुस्तीचे काम करण्याकरिता दोन्ही दिवस पाणी पुरवठा बंद राहणार आहे.शहरी व ग्रामीण भागातील नळ धारकांनी याची नोंद घ्यावी व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणास सर्व नागरिकांनी सहकार्य करावे असे उपविभागीय अभियंता श्री.विजय शेंडे यांनी यावेळी म्हटले.