
दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी-नवनाथ यादव
भूम:- कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने ११७०० कोटि रुपये मंजूर केल्याचा आनंदोत्सव भूम तालुका भारतीय जनता पक्षाच्यावतीने गोलाई चौकात घोषणाबाजी करत आनंदोत्सव साजरा केला.
मंगळवार दि ४ आक्टोंबर २०२२ रोजीच्या राज्य कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये उस्मानाबाद ,बीड जिल्ह्याला आधार असलेला प्रकल्पाच्य कामासाठी राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस सरकारने ११७०० कोटी रुपये मंजूर केले आहेत . त्यामुळे भूम परंडा वाशी विधानसभा मतदारसंघासह उस्मानाबाद , बीड जिल्ह्याला २१ टीएमसी पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या घेतलेल्या महत्त्वाकाक्षी निर्णयाचे सरकारचे मतदार संघाच्यावतीने जाहिर आभार मानले.
कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पसाठी ११७०० कोटि मंजूर केल्याने भूम परडा वाशी मतदारसंघ होणार सुजलाम सुफलाम होणार आहे. याचा उस्मानाबाद व बीड जिलहयाला होणार फायदा आहे. तसेच १२४००० हेक्टर ओलिता खाली येणार आहे..२३ . ६६ अब्ज घनफूट पाणी उपलब्ध होणार आहे.
यावेळी भारतीय जनता पार्टिचे जेष्ठ नेते बाळासाहेब क्षिरसागर,जिल्हा सरचिरणीस आदम शेख,सरचिटणीस संतोष सुपेकर, शहराध्यक्ष शंकर खामकर,माजी नगरसेवक रोहन जाधव, उद्योग आघाडी तालुका अध्यक्ष बापू बगाडे, सचिन बारगजे , सचिन मस्के, मिडिया सेल अध्यक्ष सुजित वेदपाठक . उपाध्यक्ष बाबासाहेब वीर,नितीन सासवडे,जयसिंग पवार, दिनेश पौळ, राम तेलंगे आदी उपस्थित होते.