
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
- आमरावती :- निष्काम कर्मयोगी संत गाडगेबाबा यांचा दशसूत्री फलक मंत्रालयात त्वरित लावा या मागणीचे निवेदन स्थानिक कर्मयोगी फाउंडेशनच्या वतीने अंजनगाव सुर्जी तहसील कार्यालया मार्फत मुख्यमंत्री यांना सादर करण्यात आले
अवघ्या महाराष्ट्राचेच नव्हे तर भारत देशाचे दैवत असलेले, सर्वांना स्वच्छतेचा संदेश देणारे, समाजाला कल्याणकारी मार्ग दाखवणारे, दिन-दुबळ्यांना मदतीचा हात द्या सांगणारे, स्वच्छता अभियानाला दिशा देणारे, ज्यांच्या नावाने शासकीय स्वच्छता अभियान आज सुरु आहे असे महामानव कर्मयोगी गाडगे बाबा यांची दश सूत्री असलेले फलक नुकतेच मंत्रालयाच्या दर्शनी भागातून हटविण्यात आले. परिणामी संत गाडगेबाबा विचार प्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत तसेच हा प्रकार म्हणजे पुरोगामी महाराष्ट्रात संत गाडगेबाबांच्या विचाराला मिटविण्याचा प्रयत्न आहे. तेव्हा सरकारने त्वरित हा फलक पूर्ववत लावावा या आशयाचे निवेदन स्थानिक कर्मयोगी फाउंडेशनच्या वतीने तहसील कार्यालय अंजनगाव सुर्जी मार्फत मुख्यमंत्री यांना सादर करण्यात आले. निवेदन देतेवेळी कर्मयोगी फाउंडेशनचे अध्यक्ष ललित ढेपे,सदस्य व नागरिक प्रवीण पेटकर, अजय माहुलकर, माजी सैनिक रामहरी खोकले, अनिल शेवाणे, स्वप्नील ढोले, मुकेश वानरे, नितीन वानखडे, राहुल ताडे, शरद पिसे, राजेंद्र सावरकर, गजानन सहारे, नित्यानंद पांढरकर, प्रशांत सायवान, आत्माराम ब्राह्मण, स्वप्नील गिर्हे, निरंजन वानखडे, वैभव सोनटक्के, मदन राऊत, रमेश काळे, अमर मोरे, सुनील अळसपुरकर तसेच ग्रामस्थ आदी उपस्थित होते.