
दैनिक चालु वार्ता कंधार प्रतिनीधी- माधव गोटमवाड
दसरा हा भारतामध्ये हिंदू धर्मामध्ये सगळ्यात मोठा सण मानला जातो , जे हिंदू धर्मानुसार साडेतीन मुहूर्तापैकी एक दसऱ्याचा मुहूर्त मानला जातो. विशेषतः भारत आणि नेपाळ मध्ये दसरा विविध पद्धतीने साजरा केला जातो आणि सगळ्यात महत्त्वाचं या दसऱ्याचे तीन चार संबंधित ग्रंथांशी याचा संबंध जोडला गेला आहे किंवा उल्लेख केला आहे .
रामायण या ग्रंथामध्ये दसऱ्याचे विशेष महत्त्व-
रामायण या ग्रंथानुसार दसऱ्याच्या दिवशी रामाने रावणाचा वध केला होता .रावणावर रामाने विजय मिळवला होता, म्हणून दसऱ्याला वेगळं महत्त्व आहे .जे रावणामध्ये अवगुण होते त्या अवगुणाचा नाश करून त्याच्यावरती विजय मिळवल्याबद्दल हा दसरा साजरा केला जातो असे रामायणामध्ये पण उल्लेख आहे.
नवरात्रीशी दसऱ्याचा संबंध–
नवरात्रीमध्ये घट बसवणे किंवा घटस्थापनेपासून दसऱ्याच्या या नऊ दिवसांमध्ये त्याचे वेगळे विशेष महत्त्व आहे आणि या वैकल्पिकरित्या बघितलं तर सरस्वती ,राम, महाभारतात पांडव ,दुर्गामाता यांच्याशी दसऱ्याचा संबंध येतो.
दुर्गा मातेची दसऱ्याचा संबंध-
महिषासुर या राक्षसाचा वध करून दुर्गा मातेने त्याच्यावर विजय मिळवला होता व धर्माची स्थापना केली होती म्हणून दसऱ्याला वेगळं महत्त्व आहे.
महाभारतात दसऱ्याचे महत्त्व-
महाभारतामध्ये कौरव – पांडव होते . अज्ञात वास पांडवांना मिळाला होता अज्ञातवासाची समाप्ती झाली होती म्हणून इथे याचा संबंध जोडला गेला आहे.
भारतामध्ये वेगवेगळ्या भागात साजरा होतो दसरा–
भारताच्या उत्तरेला, दक्षिणेला, पश्चिमेला व वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने दसरा साजरा केला जातो. कुठे नृत्य केले जाते ,तर कुठे विविध प्रकारे दसरा साजरा केला जातो आणि विशेष म्हणजे मध्य भारतात शिव ओलांडणे ही प्रथा आहे की ,शिव ओलांडणे म्हणजे आपट्याच्या झाडाला पुंजणे या दिवशी आपट्याच्या झाडाला सोन्याचे महत्त्व आहे आणि त्याला पुंजून शिव ओलांडून सोन लुटने असा प्रकार घडत असतो विशेषता महाराष्ट्र बऱ्याच ठिकाणी आपट्याच्या झाडाचे सोन लुटणे हा प्रकार होतो .
अशा विविध रीतीने दसऱ्याला महत्त्व प्राप्त आहे म्हणून साडेतीन मुहूर्तापैकी एक दसरा हा सण आहे या दसऱ्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा.
शुभेच्छुक- संपादक डी.एस.लोखंडे पाटील