
दैनिक चालू वार्ता नांदेड प्रतिनीधी प्रा.यानभुरे जयवंत सोपानराव
नांदेड – मुप्टा ही शिक्षक संघटना गेल्या पंचवीस वर्षापासून शिक्षक प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या न्याय हक्कासाठी लढणारी संघटना म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ओळखली जाते. या संघटनेच्या कनिष्ठ विभागाच्या नांदेड जिल्हाध्यक्ष पदी *प्रा. जालिंदर वाहूळ*
यांची निवड शिक्षक संघटनेचे नेते व विभागीय सचिव प्रा. डॉक्टर सुनील मगरे यांनी केली आहे.
याप्रसंगी कार्यक्रमास विभागीय अध्यक्ष प्रा. डॉक्टर संभाजी वाघमारे ,प्रा.डॉक्टर भास्कर टेकाळे, हाजी शाहिद कादरी , शफीउल्लाह खान ,संदीप काजळे ,प्रवीण कुमार डावरे ,प्रा.शशिकांत जावळे प्रा. बाळासाहेब गव्हाणे, शरद मगर ,अमित वाघमारे इत्यादी
पदाधिकारी उपस्थित होते. त्यांच्या या निवडीबद्दल राजर्षी शाहू सैनिकी विद्यालयाचे प्राचार्य माननीय धनंजय वकील सर,सायन्स काॅॅलेेज नांदेड चे प्राचार्य मा. डॉ.डी.यु.गवई सर ,श्री शिवाजी ज्युनिअर कॉलेज माणिकनगर नांदेड चे उपप्राचार्य तथा महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना नांदेडचे जिल्हा सरचिटणिस मा.परशुराम येसलवाड, सायन्स कॉलेज नांदेडचे उपप्राचार्य मा.एकनाथ खिल्लारे,नेताजी सुभाषचंद्र बोस कॉलेज नांदेडचे उपप्राचार्य मा.अजय संगेवार यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.