
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
मुंबई : दसऱ्यानिमित्त आज शिवसेनेचा दसरा मेळावा मुंबईतील शिवाजी पार्क येथे होत तर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा हा बीकेसी मैदानावर होत आहे. शिंदेंच्या बंडानंतर शिवसेनेत फूट पडली त्यानंतर शिंदे गट आणि शिवसेना हे दोन गट अनेक वेळा एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत.
एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा वांद्रे येथील बीकेसी मैदानावर चालू झाला आहे. तर उद्धव ठाकरे यांचा शिवाजी पार्कवर मेळावा चालू आहे. दोन्ही ही मैदानांवर मोठी गर्दी उसळली आहे. गर्दी जमविण्यासाठी दोन्ही बाजूने संपूर्ण ताकद पणाला लावली होता. दोन्ही गटांच्या मेळाव्याची उत्सुकता आता शिगेला पोहचली होती.
मात्र एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरे यांना जोरदार धक्का दिला आहे. BKC मैदानावर चालू असलेल्या शिंदे गटाच्या मेळाव्याला उद्धव ठाकरे यांचे मोठे बंधू जयदेव बाळासाहेब ठाकरे यांनी हजेरी लावल्यामुळे अनेकांच्या नजरा उंचावल्या आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का मानला जातो. दरम्यान शिंदेगटाचे नेते रामदास कदमांनी ठाकरेंवर टीका केला आहे. ते म्हणाले “उद्धव ठाकरेंना घर सांभाळता येत नसेल तर महाराष्ट्र काय सांभाळणार आहेत.”