
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी आर्णी -श्री, रमेश राठोड
******”*********”**********”*********”
सावळी सदोबा-आर्णि तालुक्यातील सावळी सदोबा हा परिसर अतिशय दुर्गम व नक्षलग्रस्त परिसर म्हणून ओळखला जातो,या परिसरातील 80 टक्के ग्रामपंचायत आदिवासी बहुल असून,सावळी सदोबा परिसरातील नागरिकांना सेवा पुरवण्यासाठी नायब तहसील कार्यालय चालू करण्यात आले होते,मात्र काही दिवसापासून हे नायब तहसील कार्यालय दैनंदिनी चालू न राहता फक्त आठवडी बाजाराच्या दिवशी म्हणजे गुरुवार या दिवसीच चालू असायचे,मात्र आज गुरुवार असताना सुद्धा हे नायब तहसील कार्यालय बंद असल्याने,नागरिकांना छोट्या छोट्या कामासाठी तालुक्याच्या ठिकाणी जावे लागत आहे, या परिसरातील रस्त्याच्या विकास पाहता गोरगरीब,मजुरांना आर्णी तहसील कार्यालयाच्या चकरा मारावा लागत आहे,त्यामुळे सावळी सदोबा येथील नायब तहसील कार्यालय सध्या शोभेची वस्तू बनले आहे,आर्णी तालुक्यातील आदिवासी बहूबल असलेल्या सावळी सदोबा सर्कलमध्ये नागरिकांची गरज पाहता,या परिसरातील नागरिकांना छोट्या छोट्या कामासाठी तहसील कार्यालयाच्या चकरा माराव्या लागत होत्या,नागरिकांचा त्रास वाचावा या एकमेव हेतूने सावळी सदोबा येथे नायब तहसील कार्यालय चालू करण्यात आले होते,मात्र या कार्यालयात मागील काही दिवसापासून कोणीच राहत नसल्याने,नायब तहसील कार्यालय शोभेची वस्तू बनलेली आहेत,येथे फक्त हप्त्यातून एकदाच तलाठी बसतात त्यानंतर आठवडाभर लोकांना आणि तहसील कार्यालयाच्या चकरा माराव्या लागत आहे,या नायब तहसील कार्यालयात नागरिकांना कुठली सेवा मिळत नाही,नागरिकांना छोट्या-छोट्या कामासाठी आर्णी तहसील कार्यालयाच्या चकरा माराव्या लागत आहेत,त्यामुळे या परिसरातील नागरिकावर कुठेतरी आर्थिक उदंड सोसावा लागत आहे,सावळी सदोबा येथे असलेल्या नायब तहसील कार्यालयाचा नागरिकांना काय फायदा असाही सवाल परिसरातील नागरिक व्यक्त करीत आहे