
दैनिक चालु वार्ता कंधार प्रतिनिधी-
राष्ट्रपिता मोहनदास करमचंद गांधी यांची जयंती दरवर्षी गांधी जयंती म्हणून संपूर्ण देशभरात साजरी केली जाते. गुजरातमधील पोरबंदर येथे २ ऑक्टोबर १८६९ रोजी महात्मा गांधी यांचा जन्म झाला. या दिवशी देशात आणि जगभरात बापूंच्या स्मरणार्थ सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या दिवशी शाळेतुन नवीन पिढीला महात्मा गांधीच्या देशासाठी योगदानाचे महत्त्व समजावून सांगण्यासाठी शाळेमध्ये भाषण, निबंध लेखन अश्या विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात येते.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५३ व्या जयंती निमित्त कंधार तालुक्यातील आण्णा हजारे जन आंदोलन संघटना शाखा कंधार यांच्या वतीने जि.प. प्रा.शा.गऊळ येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या वेळी महात्मा गांधी यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी इंग्रजांविरुद्ध केलेले उठाव व आंदोलनाची माहिती देत नविन पिढीने बापुने देशासाठी दिलेल्या बलिदानाची जाणिव ठेवले पाहिजे असे या वेळी सांगण्यात आले. तदनंतर जि. प. प्रा. शाळा गऊळच्या शालेय विध्यार्थाना वह्या व पेन वाटप करण्यात आले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बालाजी पा. गिरे हे होते तर प्रमुख पाहुने नन्हु गुट्टे .तसेच माधवराव ईभुते .विष्णुदास डांगे भास्कर खोडससकर .डाॅ .जोगदंड ,शाळेचे मुख्याध्यापक,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या सह गावातील अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे संचलन श्री पांचाळ सर यांनि केले .तर आभार श्री.तेलंगे सर यांनी मानले