
दैनिक चालु वार्ता खानापुर प्रतिनिधि- मानिक सुर्यवंशी
बिलोली तालुक्यातील चिटमोगरा येथील
महिला हुलूबाई लक्ष्मण काळेकर वय ५० वर्ष यांच्या अंगावर वीज पडून जागीच मृत्यू झाल्याची घटना दि.१४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेचार वाजता चिटमोगरा शिवारात घडली.
चिटमोगारा ता.बिलोली येथील महिला हुलूबाई लक्ष्मण काळेकर ह्या शेतातुन गवत घेऊन घराकडे येत असताना अचानक सायंकाळी साडेचारच्या दरम्यान आलेल्या वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊसात गावाजवळ असलेल्या खंडोबा मंदिर बाजूस विज कोसळून हुलूबाई लक्ष्मण काळेकर यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांच्या सोबत असलेल्या जाऊ सुमनबाई मारोती काळेकर व भाया मोरोती हानंमत काळेकर यांनी ही विजेचा शाॅक लागल्याने दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. सदरील घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरणिय तपासणीसाठी नायगाव च्या ग्रामीण रूग्णालयात पाठविले .
मयत हुलूबाई लक्ष्मण काळेकर यांच्या पष्चात पत्ती,दोन मुले ,तिन मुली असा मोठा परिवार आहे. हि दुःखद घटना चिटमोगरा नगरीतील नागरीकांना समजताच सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.