
दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी- नवनाथ यादव
वंजारवाडी येथे उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे (भम),तहसीलदार उषाकिरण श्रृंगारे (भूम)यांचा सन्मान करण्यात आला
भूम:-तालुक्यातील वंजारवाडी येथे उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे व तहसीलदार उषाकिरण श्रृंगारे यांनी तालुक्यात प्रधानमंत्री किसान योजना आयुष्यमान भारत योजना या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी आल्या होत्या. यावेळी जास्तीत जास्त लोकांनी या योजनेचा फायदा घ्यावा, असे आवाहन उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांनी केले. तसेच यावेळी आढावा सुद्धा घेण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष प्रभाकर डोंबाळे, पोलिस पाटील लक्ष्मण तेलंगे, अमोल डोंबाळे, रमाकांत सोनवणे, काका जगदाळे, सुनील खोसरे, काका तेलंगे, आश्रुबा डोंबाळे, शिवाजी मोटे, शिवाजी डोंबाळे, तलाठी थोरात,शिवाजी तेलंगे, चंदनशिवे, पंकज पंडित, सुनिता पंडित, सूर्यकांत कोळी, अण्णा मस्के, ग्रामसेवक स्वामी आदी उपस्थित होते.