
दैनिक चालू वार्ता जालना प्रतिनिधी-आकाश माने
जालना, दि. 1 – जालना औद्योगिक वसाहतीमधील स्टिल कंपनीत भीषण स्फोट होऊन 4 जण जखमी झाल्याची घटना आज घडली. आज दुपारी 11 ते 12 वाजेदरम्यान ही घटना घडली. ज्या भट्टीत स्फोट झाला त्या भट्टीचे अक्षरशः तुकडे झाले. दरम्यान, दोघे गंभीर असल्याची प्राथमिक माहिती आहे.
हा स्फोट इतका भीषण होता की, आजूबाजूचा परिसर हादरून गेला. जालना येथील औद्योगिक वसाहतीतील गीताई स्टील कंपनीत ही भीषण घटना घडली. या दुर्घटनेत 4 कामगार जखमी झाल्याची प्राथमिक माहिती असून आहे.
जखमींना जवळच्या रुग्णलयात हलवले आहे. जालना औद्योगिक वसाहतीत स्फोट होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. अनेकदा या वसाहतीमध्ये स्फोट झालेले आहे.
कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
जालना औद्योगिक वसाहतीतील स्टील कंपन्यात कंपनीकडून कामगारांच्या सुरक्षतेची कुठलीही काळजी घेतल्या जात नसल्याचा आरोप यापूर्वीही अनेकदा झाला आहे. यानिमित्ताने हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अनेक भीषण स्फोटात अनेकांचे बळी गेले असून काहींना कायमचे अपंगत्व आले आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्त्यांनी अनेकवेळा कारवाईची मागणी केली. मात्र, याची प्रशासनाकडून हवी तशी खबरदारी घेतली नसल्याचा आरोप होत आहे.