
दैनिक चालू वार्ता कंधार प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
कौठा:- रस्त्याचे जशे जाळे निर्माण झाले तशे रस्त्यालगत अवैध धंद्दे प्रचंड प्रमाणात वाढत आहेत अवैध धंद्यामुळे वाढती गुन्हेगारी दारूड्याचा धुमाकुळ रोखणे पोलिसा पुढे अहवान आहे कौठ्या पासुन कंधार पोलिस ठाणे ३० किमी अंतर असल्याने पोलिस याभागाकडे गुन्हा दाखल झाला तरच येत असल्याने गुन्हेगार अवैद्दे व्यवसाय करणार्याचे मनबोल वाढत असल्याने पोलिस स्थानक होणे गरजेचे आहे.
कंधार तालुक्याच्या शेवटच्या टोकाला असलेल्या कौठा परिसरात सध्या गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे बाजार पेठेत दिवसा दारुडे गोंधळ घालत आहेत अल्पवयीन तरुण हत्यार बाळगत आहेत. चिकन उधारी देत नसल्याने दारुड्याने मैनोदिन पिंजारी या दुकानदारास दगड घालुन जखमी केले रस्त्याच्या बाजूला लावलेल्या वाहानाचे पार्ट चोरीच्या घटना मध्ये वाढ झाली आहे अश्या किरकोळ घटना घडत असल्या तरी संबंधित नागरिक पोलिस स्थानक जवळ नसल्याने गुन्हा दाखल करण्यासाठी जात नाहीत यात गुन्हेगारांचे मनोबल वाढत आहे बाजार पेठेत दररोज दारुड्याचा हैदोस घातला जात आहे यावर आळा घालण्यासाठी गावात पोलिस स्थानक नाही झाले तर पोलिस चौकी तरी होणे आवश्यक आहे.गावातुन राष्ट्रीय महामार्ग गेल्याने अवैध दारु रात्रीच्या सुमारास तस्करीचे प्रमाण वाढत आहे तात्काळ कौठा येथे पोलिस चौकी तरी करण्यात यावी अशी मागणी होत आहे.