
दैनिक चालू वार्ता हातकणंगले प्रतिनिधी-कवि सरकार इंगळी.
सध्या गावागावांत ऊसतोड सुरू आहे. साखर कारखान्यांनी ऊसतोड मजूरांची जबाबदारी ही वाहनधारकावर सोपवलेली असते.वाहनधारक हे सुद्धा मोठे बागायतदार शेतकरीचं असतात.त्यांनी ऊसतोड मजूरांना चारसहा महिन्याच्या सिजनसाठी एका एका टोळीला मुकामदमाच्या भरवशावर वीस ते तीस लाख रूपये टोळीसाठी देत असतात.पाच दहा वर्षापूर्वीच्या अगदोर ऊसतोड मजूर ऊसाचे वाडे विकून उदर निर्वाह चालवत होते.त्यावेळी बैलगाड्या हि ऊस वहातूकीसाठी होत्या.पण काळ बदलत गेला तसा बैलगाड्या कमी होत गेल्या.ऊसतोड मजूर पैसे घेऊन सुध्दा फसवाफसवी करत असलेने कारखानदारांनी टोळी आणण्याकरिता वहानधारक शेतकऱ्यांना जबाबदारी दिली.तेच वहानधारक भरमसाठ पैसा टोळीसाठी लावून सुध्दा कैक टोळ्या येत नाहीत.त्यामुळे अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत आले आहे.
सध्या ऊसतोड मजूर पावसाळा हंगामात पैसे घेतात.
वहानधारक शेतकरी कर्ज काढून पैसे दिलेले असतात.त्यामुळे ऊसतोड मजूरांना ऊसाचे वाडे रानात टाकून फक्त ऊसतोड करून जास्तीजास्त ऊस वहातूक करणेसाठी तगादा लावत असतात.त्याप्रमाणे मजूर लोक बराच ऊस कंडके तोडून टाकणे ऊस पाल्यात राखणे असे प्रकार घडत असतात.शेतकरीवर्ग इतर मजूर कडून पगार देऊन कांड्या गोळा करतात.
आज अशी परिस्थीती झाली आहे कि,ऊसतोड मजूर एक एकरास ऊसतोडीसाठी सात आठ हजार रूपये मागणी करतात.शेतकरी आर्थिक अडचणीत असून सुद्धा आर्थिक तडजोड करून चार ते पाच हजार रूपये देत असतात.त्यामुळे सध्या गावागावांत सध्या शेतकरी आणि ऊसतोड मजूर यांच्यात आर्थिक तडजोडीत ऊसमजूर जोमात तर शेतकरी राजा कोमात अशी अवस्था झाली आहे. यात खरे लहान कमी शेती अ णारे गोरगरीब शेतकरी ऊस तोड करून ऊस कारखान्यात जाई प्रर्यंत मेटाकुठीस येत आहे. शिवाय वहान चालकांना एका खेपेस जेवणसाठी तीनशे रूपये द्यावे लागत आहे. काही ऊसतोड मजूरांना चहा देणे बंधनकार आहे.शेतकरीवर्ग तक्रार केले तर मजूर ऊस तोडत नाहीत.वहानधारक म्हणतो आम्ही पैसे लावले आहे. आमची टोळी गेलीतर जबाबदार कोण.अशा ऊसतोड गुंतागुंतीच्या कचाट्यात वहानधारक व शेतकरीवर्ग सापडलेले आहेत.
यापूरवी ऊसतोड मजूर शेतकऱ्याच्या़कडे ऊस तोड चिठृठी घेऊन शेतकऱ्याच्या घरी जात असत.आता मात्र शेतकरीवर्ग ऊसतोड मजूरांच्या मागे लागलेले दिसून येत आहे.
आज सर्वत्र ऊसतोड करायची म्हंटलं की शेतकऱ्यांना ऊस कारखान्याला पाठवायचा म्हंटलं की अगोदर अर्थिक नियोजन करावे लागत आहे. म्हणून तर गावागावांत आज ऊसतोड मजूर जोमात आहे तर शेतकरीवर्ग कोमात अशी परिस्थीती झाली.