
दैनिक चालु वार्ता पुणे शहर प्रतिनिधी :- जब्बार मुलाणी
—————————————-
भिगवण
दि. ०६/११/२०२२.रोजी शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे .यांचे भिगवण मध्ये शिवसैनिका कडून जोरदार स्वागत करण्यात आले .सुषमा यांच्या आगमना नंतर शिवसेना पुणे जिल्हा उपप्रमुख संजय काळे , भिगवण शहर प्रमुख रामचंद्र पाचांगणे यांनी शाल व श्रीफळ देऊन त्यांचे स्वागत केले त्या वेळी शिवसेना उप तालुका प्रमुख फिरोज पठाण , विभाग प्रमुख पांडुरंग वाघ , बाळासाहेब भोसले , उपविभाग प्रमुख दत्ता कदम , तक्रारवाडी शाखा प्रमुख प्रवीण मोहिते , अन्ना आढाव , कुणाल भोसले , सनी शेलार , वैभव आढाव. आणि पन्नास शिवसैनिक व गावातील इतर नागरिक उपस्थित होते .
भिगवण व आसपासच्या शिवसैनिकांना बळ देण्यासाठी मी येथील शिवसैनिकांना भेटण्या साठी आले असे सांगितले.त्या नंतर भिगवण मधील कार्यकर्त्याशी चर्चा करण्यात आली…