
दैनिक चालु वार्ता इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
शेटफळ हवेली येथे मागील अनेक वर्षाची परंपरा असलेला अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या भक्तिभावाने १० नोव्हेंबर पासून प्रारंभ होत आहे. हरिनाम सप्ताहात रोज पहाटे ४ ते सकाळी ६ महापूजा व काकडा आरती, सकाळी ६ ते ७ अभिषेक, सकाळी ७ ते ११ ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी ११ ते १ गाथाभजन, दुपारी १ ते २ भोजन,४ ते ५ हरिपाठ, सायंकाळी ७ ते ९ किर्तन, रात्री ९ ते १० महाप्रसाद,रात्री १२ ते २ हरिजागर आदी धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.
शेटफळ हवेली येथील भैरवनाथ जन्मोत्सवा निमित्त सदर सप्ताहाचे आयोजन भैरवनाथ मंदिर येथे करण्यात आले आहे.या सप्ताहाचे हे २६ वे वर्ष आहे. यानिमित्त मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
सप्ताहातील कीर्तन याप्रमाणे-१० नोव्हेंबर रोजी गुरुवर्य बापूसाहेब महाराज देहूकर,११ नोव्हेंबर रोजी गणेश महाराज भगत, नातेपुते,१२ नोव्हेंबर रोजी राजीव महाराज करडे, इंदापूर,१३ नोव्हेंबर रोजी रामभाऊ महाराज निंबाळकर, बिटरगांव,१४ नोव्हेंबर रोजी अशोक महाराज शास्त्री,इनामगांव,१५ नोव्हेंबर रोजी किशोर महाराज रोकडे (प्रति- इंदूरीकर),या नामवंत किर्तनकारांची सेवा होणार आहे. १६ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता पालखी व दिंडी सोहळा तसेच घोड्याचे गोल रिंगण व रात्री १० ते १२ ब्रह्मानंद महाराज कुंभार,उपळाईकर यांचे श्री भैरवनाथ जन्माचे किर्तन होईल.त्यानंतर श्री नाथजन्मोत्सव व दिमाखदार दिपोत्सव साजरा करण्यात आला आहे.१७ नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते १२ चैतन्य महाराज देहूकर यांचे काल्याचे किर्तन होईल.या नंतर शेटफळ हवेली ग्रामस्थांच्या वतीने महाप्रसाद होईल व सप्ताहाची सांगता होणार आहे.
तरी या सप्ताहाचा शेटफळ हवेली व पंचक्रोशीतील सर्व जास्तीत जास्त भक्तांनी लाभ घेण्याचे आवाहन सप्ताह कमिटी व ग्रामस्थांनी केले आहे.