
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- प्रदिप मडावी
राजुरा
राजूरा तालुक्यातील इसापूर ग्रामपंचायतीची निवडणूक नुकतीच पार पडली त्यात गोंडवाना गणतंत्र पार्टीचे युवानेते गजानन पाटील जुमनाके यांच्या मार्गदर्शनाखाली गोंडवाना गणतंत्र पार्टीने बाजी मारली.
आज इसापूर येथील सर्व नवनियुक्त ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांनी गजानन पाटील जुमनाके यांच्या जिवती येथील निवास्थानी भेट घेतली.
यावेळी सरपंच शुभांगी राजेश आत्राम, ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल चंदू जुमनाके, छाया भोजू उदे, शंकर संभाजी कोटनाके, दिनेश पांडुरंग ठाकरे, पार्वता देवराव जुमनाके, इंदू चिन्नू सिडाम, रुपाली पुरुषोत्तम कष्टी व विजयाचे शिल्पकार सुंगाजी आत्राम यांचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.
या प्रसंगी गोंडवाना गणतंत्र पार्टीचे युवानेते गजानन पाटील जुमनाके, माजी जिल्हापरिषद सदस्या तथा नगरसेविका सतलूबाई जुमनाके, नगरसेवक ममताजी जाधव, नगरसेविका लक्ष्मीबाई जुमनाके, नगरसेवक जमालुद्दीन शेख, नगरसेवक क्रिष्णा सिडाम, माजी जिल्हा परिषद सदस्य निशिकांत सोनकांबळे, महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते महेबूब शेख, जिल्हाउपाध्यक्ष भीमराव मेश्राम, तालुकाध्यक्ष हनुमंत कुमरे, राज गोंडवाना गड संरक्षण समितीचे अध्यक्ष भीमराव पाटील जुमनाके उपस्थित होते.