
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे.
देगलूरसध्या देशभरात काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या भारत जोडो यात्रेची चांगलीच चर्चा सुरू आहे. सध्या ही यात्रा महाराष्ट्रात पोहोचली असून सोमवारी रात्री नांदेड जिल्ह्यातील देगलूरमध्ये दाखल झाली आहे. राज्यात भारत जोडो यात्रेच्या आगमनाने काँग्रेस पक्षाचे सगळेच कार्यकर्ते उत्साहाने सहभागी झाल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान या यात्रेला मोठा धक्का बसल्याने यात्रा आणखी चर्चेचा विषय ठरू लागली आहे. देगलूर मधील यात्रा अटकळी येथे पोहोचली असता एक दुर्दैवी घटना घडली. काँग्रेस सेवादलाचे राष्ट्रीय सरचिटणीस कृष्णकुमार पांडे (नागपूर) यांचा हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा यात्रेदरम्यान मृत्यू झाला.सेवादलाचे राष्ट्रीय सरचिटणीस कृष्णकुमार पांडे (नागपूर) यांचा हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा यात्रेदरम्यान मृत्यू झाला. पांडे यांच्या मृत्यूने काँग्रेस वर्तुळातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहेत.
भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रात पोहोचली आहे. राज्यातील यात्रेचा आज दुसरा दिवस असून चार दिवस ही यात्रा नांदेड जिल्ह्यात आहे. सदर यात्रेची माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, आमदार अमर राजूरकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी नियोजन केले आहे, दरम्यान याचवेळी एक मोठी घटना घडली. कृष्ण कुमार पांडे यांनी यात्रेदरम्यान ह्रदयविकाराचा जोरदार झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला.हाती आलेल्या माहितीनुसार, यात्रेच्या वेळी कृष्ण कुमार पांडे झेंडा तुकडीचे संचालन करत होते. त्याचवेळी त्यांना श्वास घेण्यास कठीण होऊ लागले. पांडे यांना श्वासोच्छवास करण्यास त्रास जाणवू लागल्याने त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, उपचार सुरू असतानाच कृष्ण कुमार पांडे यांनी अखेरचा श्वास घेतला. पांडे यांच्या अचानक जाण्याने काँग्रेसमधून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
दुपारच्या कॅम्पमधे उपस्थित काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश, दिग्विजय सिंह, सेवादलाचे राष्ट्रीय अध्यक्ष लालजी देसाई, एच के पाटील, नाना पटोले, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, संदेश सिंगलकर, महेंद्र सिंह वोहरा यांच्याकडून श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. दरम्यान कृष्ण कुमार पांडे यांचे शवविच्छेदन झाल्यानंतर काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या शिबिरस्थळी पांडे यांचे पार्थिव नेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.
त्यानंतर पार्थिव नागपर येथे नेले जाणार आहे.झाल्यानंतर काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या शिबिरस्थळी पांडे यांचे पार्थिव नेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.
त्यानंतर पार्थिव नागपूर येथे नेले जाणार आहे. सध्या कृष्ण कुमार पांडे यांच्या कुटुंबियांसोबत रुग्णालयात काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची उपस्थिती पाहायला मिळत आहे. कृष्ण कुमार पांडे हे काँग्रेसमधील महत्त्वाचे कार्यकर्ते म्हणून नाव मोठे होते. पांडे गेल्या पाच दशकापासून काँग्रेस व सेवादलमध्ये सक्रीय होते. याआधी ते आंध्र प्रदेश, कर्नाटकसह विविध राज्याचे ते प्रभारी होते. अगदी दीड वर्षांपूर्वीच पांडे यांचे पुत्र धीरज यांचे कोरोनामुळे निधन झाले. धीरज सुद्धा काँग्रेसमध्ये चांगलेच सक्रीय होते, त्यावेळी ते युवक सांभाळत होते. काँग्रेसचा पदभार सांभाळत होते