
दैनिक चालू वार्ता कंधार ग्रामीण प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
कलंबर :- संजय गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कलंबरचे दोन विद्यार्थी भारतीय सैन्य दलात दाखल झाले असून त्यांनी विज्ञान शाखेतून शिक्षण घेतले आहे. विठ्ठल संतोषराव भोकरे रा.गांधीनगर कलंबर बु.ता.लोहा परिक्षा विभाग एस.एस.सी.जी.डी.पदाचे नाव सशस्त्र सीमा बल ( एस.एस.बी.) मध्ये व दुसरा विद्यार्थी गणेश रमाकांत पांचाळ रा.कलंबर खुर्द ता.लोहा परीक्षा विभाग एस.एस.सी.जी.डी.पदाचे नाव सीमा सुरक्षा दल (बि.एस.एफ.) मध्ये निवड झाली आहे.त्यांच्या या निवडीमुळे संस्थेच्या सचिव श्रीमती मुद्रीकाबाई निवृत्तीराव पाटील घोरबांड, संस्थेचे अध्यक्ष श्री.मारोतीराव पाटील घोरबांड साहेब, शाळेचे मुख्याध्यापक व प्राचार्य श्री.एस.एन.मामडे साहेब, तसेच प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी,पालक सर्वांनी पुढील कार्यासाठी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले आहे.