
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी सातारा- संभाजी गोसावी.
कराड तालुक्यांतील वडगांव-हवेली गावातील एका शेतकऱ्यांने चक्क आपला रेडा ग्रामपंचायत कार्यालयांच्या तिसऱ्या मजल्यावर असलेल्या ग्रामपंचायत कार्यालयांत तक्रार करायला पोहोचला. रेड्याला पाहून ग्रामसेवक आणि कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. शेतकऱ्यांची तक्रार ऐकून घेऊन तोडगा काढला जाईल असे आश्वांसन देऊनही शेतकरी ऐकण्यांच्या मनस्थितीत नव्हता. त्यामुळे तिसऱ्या मजल्यावर ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये बराच वेळ गोंधळ सुरु होता. या घटनेची सातारा जिल्ह्यांत गमतीशीर चर्चा चांगलीच रंगली. याबाबत तक्रारदार शेतकऱ्यांच्या राहत्या घराजवळून सांड पाण्याची पाईपलाईन गेली आहे. पाईपलाईनच्या लिकेजमुळे सांडपाणी साचून दलदल आणि दुर्गंधी पसरली आहे. याचा शेतकऱ्यांच्या कुटुंबाला चांगलाच त्रांस होत होता. तसेच या शेतकऱ्यांने गेले दोन वर्षापासून ग्रामपंचायतीकडे तक्रार करुनही ग्रामपंचायतीकडूंन कोणतीही दखल घेतली गेली नाही असा शेतकऱ्यांचा आरोप आहे या तक्रारीकडे लक्ष वेधण्यासाठी शेतकऱ्यांनी चक्क आपला रेडा घेवुन ग्रामपंचायत कार्यालयांत दाखल झाला. वडगांव-हवेली ग्रामपंचायतचा काही दिवसांतच निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे अशा परिस्थितीत तक्रारदार शेतकरी रेडा घेऊन ग्रामपंचायत कार्यालयांत गेल्यामुळे हा मुद्दा निवडणुकीत चांगलाच गाजणार आहे. संबंधित शेतकऱ्यांला विरोधकांनी फुस लावून हा प्रकार करायला लावल्याचे सध्या गावात चर्चा आहे. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी गावच्या दादा नेत्याला फोन करुन तक्रारदाराची समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र तुम्ही आल्याशिवाय मी रेडा घेऊन जाणार नाही असा मात्र पवित्रा या शेतकऱ्यांने ठाम घेतला होता. या प्रकारचा व्हिडिओ कोणीही व्हायरल करायचा नाही असे ठरले मात्र कोणीतरी हा व्हिडिओ व्हायरल केला आणि या घटनेची गमतीशीर सातारा जिल्ह्यांत गमतीशीर चर्चा सुरु झाली.