
दैनिक चालू वार्ता मुखेड तालुका प्रतिनिधी- सुरेश जमदाडे
मुखेड / प्रतिनिधी
राष्ट्रीय लोकसंख्या शिक्षण प्रकल्प 2022 – 23 अंतर्गत राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण नवी दिल्ली आणि राज्य शैक्षणिक व प्रशिक्षण पुणे येथे नुकतीच राज्यस्तरीय लोकनृत्य स्पर्धा व भूमिका अभिनय स्पर्धा पार पडली लातूर विभाग मधून लोकनृत्य स्पर्धेमध्ये जि.प.हायस्कूल मुलींचे मुखेडच्या शाळेने स्पर्धेत सहभाग नोंदवला होता या राज्यस्तरिय लोकनृत्य स्पर्धेत विद्यार्थ्यांनीनी चमकदार कामगिरी करत शाळेने द्वितीय क्रमांक पटकावला आहे.
लोकसंख्या शिक्षण व किशोरवयीन विद्यार्थ्यांच्या समस्या ही या स्पर्धेची थीम होती यामध्ये प्रत्येक विभागातून प्रथम आलेले भूमिका अभिनय 8 संघ व लोकनृत्य स्पर्धेचे 8 संघ असे एकूण 16 संघ सहभागी झाले होते. लातूर विभागामधून लोकनृत्य स्पर्धेसाठी जिल्हा परिषद हायस्कूल मुलींचे मुखेड या एकमेव शाळेने सहभाग नोंदवला होता यात विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत राज्यस्तरीय झालेल्या लोकनृत्य स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक मिळविला आहे. या स्पर्धे दरम्यान राजेश पाटील, रमाकांत काठमोरे, उपसंचालक सागर व्हटकर, विकास गरड, डॉ.कमलादेवी आवटे, डॉ.नेहा बेलसरे संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांची उपस्थिती होती तसेच स्पर्धेचे परीक्षक म्हणून श्रीमती ऋतुजा जोग, श्रीमती मेघा कुंभोजकर,श्रीमती दिपाली निरगुडकर, अरुण पटवर्धन यांनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वीतेसाठी सचिन चव्हाण, श्रीमती ज्योती राजगुरू, अरुण जाधव, श्रीमती पद्मजा लामरूड, धनंजय क्षिरसागर यांनी परिश्रम घेतले. यापुर्वी जि.प.हायस्कूल मुलीची या शाळेने तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय व विभाग स्तरावर प्रथम क्रमांक मिळविला होता नुकतच राज्यस्तरिय लोकनृत्य स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळविल्याबद्दल सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे. सदर स्पर्धेच्या तयारीसाठी शाळेचे मुख्याध्यापक एम.आर.कांबळे, सांस्कृतिक विभाग प्रमुख दिलीप देवकांबळे , विश्वाबंर जाधव, सविता उमाटे, श्रीमती आशालता स्वामी, आश्विनी कुलकर्णी , सुरेखा हराळे, नरेश पोतदार, व्ही.एस.केंद्रे सह सर्व शिक्षक, शिक्षिका यांनी परिश्रम घेतले या लोकनृत्य स्पर्धेत कु.आकांक्षा वाघमारे, प्रेरणा कांबळे, ऋतुजा चव्हाण, प्रिया सोनकांबळे, वेदिका पांडे व अंजली सोनकांबळे या मुलींनी सहभाग घेतला होता.