
दैनिक चालू वार्ता कंधार ग्रामीण प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
वाका फाटा :– जोमेगाव येथील नांदेड जिल्हा काॅग्रेस पक्षाचे सरचिटणीस श्री.भास्करराव पाटील शिंदे जोमेगांवकर यांचा मुलगा अनिकेत शिंदे यांना खासदार राहुल गांधी यांनी आपुलकीने चौकशी करून त्यांच्या अंगावरील भारत जोडो यात्रा चे टि-शर्टवर अटोग्राफ देऊन शुभेच्छा दिल्या आणि सोबतीला घेऊन हात धरून भारत जोडो यात्रेत चालत होते.त्यांनी दिलेल्या शुभेच्छा व अटोग्राफ माझ्या साठी अत्यंत मोलाचे असल्याचे अनिकेत शिंदे जोमेगांवकर यांनी सांगितले की त्यांनी दिलेली भेट माझ्यासाठी अविस्मरणीय क्षण माझ्या वाट्याला आला असून मी खा.राहुल गांधी यांचा आभार मानतो.