दैनिक चालू वार्ता कंधार ग्रामीण प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
नायब तहसीलदार कामठेकर साहेब यांनी सावरगावला भेट देऊन केली चौकशी
सावरगाव :- कंधार तालुक्यातील सावरगाव निपाणी येथील स्वस्त धान्य दुकानदार सहा महिन्यापासून धान्य वाटप न करताच स्वतः हस्तलिखित चिठ्ठी लिहून देतो व गरीब महीला पुरुषांना असभ्य भाषेत संभाषण करतो.तो म्हणतो माझ काय उपडून घ्यायचेते घ्या.काय करायचे ते करा माझं काहीही वाकडे करू शकत नाही.त्याचे नाव बाळाजी मारोती वडजे असून स्वस्त धान्य दुकान क्रमांक १६५ आहे.गावतील सर्व कार्डधारकांनी चेअरमन विठ्ठल धोंडीबा ताटे यांच्या पुढाकाराने नायब तहसीलदार कामठेकर साहेब यांना त्यांच्या विरोधात अनेक पुरावे सादर केले असून तहसीलदार साहेबांनी या स्वस्त धान्य दुकानदाराला निलंबित करून नवीन स्वस्त धान्य दुकानदार नेमण्याची मागणी केली आहे.तसेच सर्व कार्डधारकांना सहा महिन्यापासून धान्य वाटप केले नाही त्यामुळे लवकरात लवकर पूर्ण गावकऱ्यांना धान्य वाटप करण्यात यावे असे आवाहन गावातील महिला जेष्ठ नागरिक यांनी तहसीलदार साहेबांना केले आहे.
