
दैनिक चालू वार्ता प्रतिनीधी -व्यंकटेश ताटे.
सावरगाव निपाणी, तालुका कंधार
कंधार तालुक्ातील सावरगाव निपाणी येथील स्वस्त धान्य दुकान मध्ये सहा महिन्यापासून धान्य वाटप न करताच बोगस पद्धतीने म्हणजे हस्तलिखित चिठ्ठी लिहून देणे व वरून गावातील लोकांना उर्मट पणे भाषा करणे तसेच असभ्ये भाषेत महिलांना बोलणे हा प्रकार घडला आहे आणि धान्य व्यवस्थित न देणे किंवा बरेच वेगळे कारणे सांगणे किंवा काही फरक नाही पडत काय करायचे ते करा तुम्ही ,अशा पद्धतीने वर्तन ह्या सर्व गोष्टीमळे गावातील लोक म्हणजे गरीब लोक हतबल झाले आहेत काय करायचं म्हणून , आज गावातील सर्व कार्डधारकांनि स्वस्त धान्य दुकान 165 यांचा सावळा गोंधळ चेहरमन विठ्ठल धोंडिबा ताटे यांच्या पुढाकाराने नायब तहसिलदार कामठेकर साहेब हे गावात आले असताना त्यांच्याकडे अनेक पुरावे सादर केले असून तहसिलदार साहेबांनी या स्वस्त धान्य दुकानदारला निलंबित करून नवीन स्वस्त धान्य दुकानदार नेमण्याची मागणी केली आहे तसेच सर्व कार्डधारकांना सहा महिन्यापासून धान्य वाटप केले नाही त्यामुळे लवकरात लवकर त्यांना धान्य वाटप करण्यात यावे असे आवाहन गावातील ज्येष्ठ महिला तसेच जेष्ठ नागरिक यांनी तहीलदारांकडे मागणी केली आहे.