दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
“””””””'”””””””””””””””””””””””””””””””‘””””
परभणी– दिवाळी सुट्टी दरम्यान विविध पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रात निरनिराळ्या घरफोड्यांच्या हातसफाईतून गंडा घालणाऱ्यांपैकी तीघाजणांच्या मुसक्या आवळण्यात परभणी पोलिसांना यश मिळाले आहे तर यातील लिप्त अन्य तीन आरोपी अद्याप फरार असले तरी त्यांनाही लवकरच जेरबंद केले जाईल असा विश्वास जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडून व्यक्त केला जात आहे.
दिवाळीच्या कालावधीत अस्थापने व शालेय सुट्ट्या असल्याने बहुतांश नागरिक आपल्या परिवारासह आपापल्या गावी किंवा अन्यत्र जात असतात. त्यातच लग्नाचा कालावधी असल्याने याच सुट्टीकालीन अवकाशामध्ये तेही मुहूर्त साधत असतात. नेमका याच संधीचा गैरफायदा घेऊन शहरातील काही भूरटे तर काही सराईत चोर दिवसा रेकी करणाऱ्यांच्या मदतीने रात्रीच्या समयी हाथ की सफाई अगदी सहजतेने करुन जातात. परिणामी नागरिक व पोलिसांचीही निंद हराम केल्याशिवाय राहात नाहीत. तथापि त्यांच्या त्या हाथ की सफाईमध्ये कितीही शातीरपणा असला तरी कायद्याचे संरक्षक व तपासकामी हात लांब असलेल्या पोलीस यंत्रणा मात्र अशा चोरांच्याही मुसक्या आवळल्या शिवाय राहात नाहीत एवढे मात्र खरे.
परभणी शहरातील विविध भागातील बंद घरांची रेकी करुन याच चोरांनी लंपास केलेल्या तब्बल १३ लाख २१ हजारांचा मुद्देमाल तर जब्त केलाच आहे शिवाय पोबारा झालेले तिचा शातीर चोरांच्या ही मुसक्या आवळण्यात जे यश मिळविले आहे ते खरोखरच कौतुकास्पद असेच म्हणावे लागेल. जिल्हा पोलीस अधीक्षक सुधाराग आर. यांचा गुन्हेगारांसंबंधी असलेला दांडगा अनुभव आणि त्यांना मिळत असलेली सहकारी अधिकाऱ्यांची उल्लेखनीय अशी साथ अधिक मौलिक ठरली जात असल्याचे दिसून येत आहे. त्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली कर्तव्या वरील सर्व तैनात पथके कर्तव्याची जागून जी तत्परता दाखवत आहेत, ते कर्तव्यातून आढळून येत आहे.
परभणी शहर व जिल्ह्यातील वाढती लोकसंख्या ध्यानी घेता त्या तुलनेत आवश्यक असे पोलीस संख्या बळ नसूनही आहे त्याच संख्येतील अपूरे पोलीस बळ निष्ठेने कर्तव्य बजावताना दिसत आहे. तथापि अपूऱ्या पोलीस दलात आणखी अधिक संख्येची भर पडावी म्हणून ना वरिष्ठ यात लक्ष घालत आहेत ना राजकीय नेते अथवा लोकप्रतिनिधींचे या अपूर्तीकडे लक्ष आहे. शहर व जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्था अबाधित राहिली जावी, गुन्हे व गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन करता यावे यासाठी प्रत्येक पोलीस दलात लोकसंख्येच्या तुलनेत अधिक प्रमाणात वाढ होणे गरजेचे असते परंतु स्थानिक राजकारणी मंडळींनी यांत लक्ष घालून आवाज उठविला जाणे स्वाभाविक असते. परिस्थितीनुसार दलातील बळ मागवणे किंवा वाढवण्याची मागणी करणे कर्तव्यावरील वरिष्ठ अधिकाऱ्याना कष्टप्राय होत असते हे नाकारून चालणार नाही.
अपूऱ्या पोलीस बळाचा गैरफायदा घेऊन शहर व परिसरात गुन्हेगारांनी बरेच डोकं वर काढल्याचे दिसून येत आहे. त्याचाच परिपाक म्हणून शहराच्या विविध भागात भूरट्या व सराईत चोऱ्या, घरफोड्या, दुकाने फोडणे, त्यातील ऐवज लंपास करणे, महिलांच्या अंगावरील दागिन्यांची खुलेआम लूट करणे, अंमली पदार्थांची वाढती तस्करी आणि वावर विघातक कृत्यांना चालना देणारी ठरली जात आहे. अगदी लहान लहान प्रकरणातून शिवीगाळी, मारामारी, जीवघेणे हल्ले, खूनासारखे गंभीर प्रकारही कमालीचे वाढले जाताना आढळून येत आहे. यातही कमी म्हणून की काय, याच चोरांनी आता देवी-देवता व मंदीराची सुध्दा लूट जोमाने सुरु केल्याचे मागील काही प्रकरणातून पुढे आले आहे. असं असलं तरी कालांतराने का होईना परंतु घटीत गुन्ह्यांतील आरोपींचा शोध घेण्याचे काम हेच पोलीस करीत असतात हे सर्वश्रुत आहे. संख्येत असलेली कमी हेच पोलीस कर्तव्यात कोणतीही कसूर होणार नाही याची मात परिपूर्ण काळजी घेताना दिसतात हे विशेष होय.
