दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर ( प्रतिनिधी)–आज दिनांक 15 नोव्हेंबर.*बिरसा मुंडा यांची जयंती व मराठवाडा मुक्ती संग्राम आंदोलनात सहभागी, नांदेड जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिकांचे योगदान*🇮🇳 याविषयी भाषण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
याप्रसंगी या कार्यक्रमासाठी लाभलेले अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक देगावकर दमन,परीक्षक जाधव सचिन व कुलकर्णी स्मिता या उपस्थित होत्या. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर या स्पर्धेसाठी गट क्रमांक एक यामध्ये पहिली ते सहावी व गट क्रमांक दोन सातवी ते दहावी याप्रमाणे विद्यार्थ्यांचे भाषण सादरीकरण झाले.
अभ्यासपूरक मंडळ प्रमुख तोटावार सुरेखा यांनी महापुरुष बिरसा मुंडा यांचा जीवन परिचय मुलांना करून दिला. स्वातंत्र्याच्या लढ्यात बिरसा मुंडा यांचे मोलाचे योगदान तसेच आदिवासी लोकांचे रक्षक, भारताचे थोर क्रांतिकारक म्हणून ओळखले जाणारे बिरसा मुंडा यांची माहिती मुलांना दिली. क्रांतिवीर बिरसा मुंडा केवळ वयाच्या पंचविसाव्या वर्षी जे बलिदान दिले. या वीराप्रमाणे आपण आपले आचार विचार ठेवून जगले पाहिजे असे या प्रसंगी मुलांना मार्गदर्शन केले.
यानंतर स्पर्धेचे परीक्षक जाधव सचिन यांनी वक्ता कसा असावा? याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व भाषणातील सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन केले शेवटी अध्यक्ष समारोपात देगावकर दमन मुलांचे अभिनंदन करून, मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरशेटवार अर्चना यांनी केले.
