
दैनिक चालू वार्ता कंधार ग्रामीण प्रतिनिधी- बाजीराव गायकवाड
कंधार :- तालुक्याचे कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी (बिडीओ) साहेब यांचा वाढदिवस पंचायत समिती कंधार मध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.कंधार तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, विस्तार अधिकारी व कर्मचारी तसेच विविध सामाजिक कार्यकर्ते, नेते, पदाधिकारी उपस्थित होते.सरपंच संघटना, ग्रामसेवक संघटना, सहभागी झाल्या होत्या.यावेळी उपस्थित श्री.गुट्टे साहेब (विस्तार अधिकारी), श्री.रेणेवाड साहेब (विस्तार अधिकारी), श्री.मारोती पंढरे, श्री.राजीव पाटील गायकवाड, श्री.पंडीत देवकांबळे, श्री.आनंदा वरवंटकर दैनिक चालू वार्ता पेठवडज सर्कल प्रतिनिधी,सिरसी,गोणार,जाकापुर, कळका येथील ग्रामसेवक साहेब यांची उपस्थिती होती.वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.