दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी-नवनाथ यादव
भूम:-जागतिक मधुमेह दिना निमित्त उपजिल्हा रुग्णालय परंडा येथिल वैद्यकीय अधिक्षक डॉ. व्ही.कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत ग्लोबल विद्यालय खानापूर येथे शिबीर आयोजित करण्यात आले.सदरील शिबिरामध्ये एकूण ४६० विद्यार्थांची नोंद करून बिपी ,शुगर,कर्करोग तसेच नेत्रतपासणी, मौखिक आरोग्य, लैंगिक समानता, भावनिक व मानसिक आरोग्य, पोषण आहार, इंटरनेटचा सावध वापर व समाज माध्यमावरील सुरक्षिततेचा प्रो्साहन व तंबाखू मुक्त शाळा इत्यादी विषयी मार्गदर्शन तानाजी गुंजाळ समुपदेशक यांनी केले.तसेच आरोग्य तपासणी डॉ.अमजद पठाण, डॉ.दयानंद पाटील, डॉ, एफत कोरबु, अधीपरीचारिका चव्हाण स्वाती, औषनिर्माण अधिकारी आरती चव्हाण यांनी उपचार करण्यात आले .सदरील शिबिरामध्ये वैद्यकिय अधिकारी ,डॉ.अमिता वराडे,अधिपरिचारिका ज्योती जगदाळे यांचा सहभाग शिबिरामध्ये होता.
