दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी – संभाजी गोसावी
सोलापूर. राज्यांत सध्या शिंदे-फडवणीस सरकार सत्तेवर आल्यापासून आयएएस अधिकारी व आयपीएस अधिकाऱ्यांचा चांगलाच बदलांचा बिगुल वाजला आहे. यामध्ये गुरुवारी रात्री उशिरा सोलापूर महापालिकेच्या आयुक्त पी. शिवाशंकर यांच्या अखेर नागपूर येथे वस्त्रोद्योग संचालक या पदावर बदली करण्यात आली तर त्यांच्या जागी श्रीमती. शीतल उगले-तेली यांची नियुक्ती करण्यांत आली आहे. राज्य शासनांच्या सामान्य प्रशासन विभागांचे अपर मुख्य सचिव( सेवा ) नितीन गद्रें यांनी तसे आदेश जारी केले. माजी आयुक्त पी. शिवाशंकर यांनी ३० एप्रिल २०२० मध्ये सोलापूर महापालिकेचा आयुक्त म्हणून पदभार घेतला होता. कोरोनाच्या काळामध्ये दोन्ही लाटे मध्ये अतिशय शिस्तप्रिय आणि उत्कृंष्ट पद्धतीने आयुक्त शिवाशंकर यांनी सोलापूर जिल्ह्यांचा कार्यभार पाहिला. तसेच मागील सहा महिन्यापासून त्यांनी अनेक सुविधा महापालिकेत राबवल्या कामचुकर कर्मचाऱ्यांवर त्यांनी चांगला जर बसविला होता. पी. शिवाशंकर यांनी सोलापूर जिल्ह्यांमध्ये उत्कृंष्ट काम करुनही त्यांच्या बदलीबाबत अनेकांची मागणी होती. तर कामगार संघटनेकडूंन धडक मोर्चा सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर पी.शिवाशंकर यांच्या बदलीबाबत काढण्यांत आला होता. अखेर गुरुवारी सायंकाळी त्यांची बदली करण्यांत आली. त्यांच्या रिक्त जागेवर नव्यांने श्रीमती. शीतल उगले-तेली या लवकरच पदभार स्वीकारतील. सन २००९ मधील तुकडीतील त्या आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी यापूर्वी पुणे, रायगड, नागपूर या जिल्ह्यांमध्ये उत्कृंष्ट काम पाहिले त्या मूळच्या अहमदनगर जिल्ह्यांतील रहिवासी आहेत. तर जळगांव जिल्ह्यांमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही त्यांनी काम पाहिले. तेथील कार्यकाळानंतर त्यांची जून २०१५ मध्ये रायगड जिल्हाधिकारी पदावर त्यांना बढती मिळाली. आता त्या सोलापूरच्या इतिहासांमध्ये पहिल्यांदाच महिला आयुक्त म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. त्यांची भारतीय प्रशासन विभागांमध्ये शिस्तप्रिय आणि कर्तव्यदक्ष अधिकारी अशी त्यांची चांगलीच ओळख आहे.
