दैनिक चालू वार्ता कंधार ग्रामीण प्रतिनिधी- बाजीराव गायकवाड
कंधार :- तालुक्यातील पेठवडज व कंधार येथे पोलिस निरीक्षक श्री.पडवळ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व पि.एस.आय.श्री.इंद्राळे साहेब यांच्या पुढाकाराने चोरी झालेल्या वाहनांचा तपास करण्यासाठी नाकाबंदी करून ६६ वाहने तपासण्यात आली.त्यामध्ये १६ वाहनांवर दंडात्मक कारवाई करून ३४,०००/- रुपये दंड वसूल करण्यात आला.आणि ४ वाहने कागदपत्रांची पूर्तता न झाल्याने पोलीस ठाण्यात लावण्यात आले आहेत.तसेच ४६ वाहने चेक करून सोडून देण्यात आले आहेत.ही तपासणी मोहिम राबविण्यासाठी कंधार पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री.पडवळ साहेब,पि.एस.आय.श्री.इंद्राळे साहेब, जमादार श्री.व्यवहारे साहेब, श्री.जूने साहेब, श्री.टाकरस साहेब, श्री.हराळे साहेब यांनी तपासणी मोहिम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले.
