दैनिक चालू वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
==========================
अहमदपूर:- आपल्या लातूर जिल्हाची शान,बान नागझरी चे सुपुत्र श्री मंचक ज्ञानोबा इप्पर , आयपीएस यांची आज DIG या पदी त्यांची पदोन्नती झाली आहे तरी यांची खासदार सुधाकर श्रृंगारे, आमदार बाबासाहेब पाटील, माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव, माजी राज्यमंत्री विनायकराव पाटील, माजी आमदार बाब्रुवान खंदाडे, गणेश दादा हाके, भा ज पा महाराष्ट्र राज्य प्रदेश प्रवक्ते, सर्व राजकीय, व्यावसायिक, मित्र परिवार व तसेच सर्व स्तरावरून कौतुक केले जात आहे.
2008 बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत त्यांना त्रिपुरा कॅडर भेटले त्यांनी 10 वर्ष त्रिपुरा मध्ये आपल्या कामाचा ठसा उमटवला बांगला देश बॉर्डर ची तस्करी असेल, दारू, मटका, आतंकवादी असतिल या सर्व कामातून त्यांनी आपले वेगळा ठसा उमटवला त्यामुळेच त्रिपुरा राज्यातील त्यावेळचे मुख्यमंत्री श्री मानिक सरकार व पोलीस महासंचालक श्री के नागराजन यांनी उत्कृष्ठ अधिकारी म्हणून दोन वेळा सन्मान करण्यात आला.
2019 मध्ये होम म्हणून महाराष्ट्र मध्ये पोस्टिंग हिंगोली येथे एसआरपीयफ मध्ये कमांडंट म्हणून दीड वर्ष कार्यभार सांभाळलं तेथे पण हिंगोली गटाला प्रथम पारितोषिक मिळाल्याबद्दल साहेबांचं सन्मान करण्यात आला. त्यानंतर दोन वर्ष अतिशय सेन्सिटिव्ह झोन म्हणणारा पिंपरी चिंचवड येथे पोलीस उपायुक्त म्हणून अतिशय उत्कृष्ट कामगिरी पार पाडली.
आता नाशिक येथे गुन्हे अन्वेषण विभाग नाशिक पोलीस अधीक्षक म्हणून कार्यभार पाहत आहेत. कुठे जरी असले तरी आपल्या गावाकडील, भागातील सर्वानाच मानाने बोलणार अधिकारी म्हणून ओळख असणारा अधिकारी आहे . आज भारत सरकारने त्यांना DIG म्हणून प्रोमशन दीले आहे.
पुढील कार्यास खूप खूप शुभेच्छा
