दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी सातारा- संभाजी गोसावी.
तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल यांच्या कार्यकाळामध्ये लोणंद पोलीस ठाण्यांचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांनी लोणंद पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारल्यापासून लोणंद हद्दीमधील अवैध धंदेवाल्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. लोणंद पोलीस ठाण्यांचा विशाल वायकर यांनी पदभार स्वीकारल्यापासून अनेक मोठमोठे गुन्हे त्यांच्या मार्गदर्शनाखाली व आपल्या पोलिस कर्मचारी समवेत त्यांनी उघडकीस आणले. मोक्याचे गुन्ह्यातील गेले चार वर्षापासून फरार असलेला व जबरी चोरीच्या गुन्हेयांतील मुख्य आरोपी बापू शिंदे याला लोणंद पोलिसांनी गजाआड केले. याबाबत लोणंद पोलिसांकडूंन मिळालेल्या माहितीवरुन लोणंद व फलटण उपविभागीय व खंडाळा लोणंद पोलीस स्टेशनच्या हद्दीत जबरी चोरीच्या गंभीर घटना घडल्या होत्या. त्यामुळे संबंधित आरोपीचा तत्काळ शोध घेवुन अटक करण्यांच्या सूचना माननीय पोलिस अधीक्षक समीर शेख,अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणंद पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील दिनांक ७ ऑक्टोंबर रोजी जबरी चोरीचा गुन्हा घडला होता. तपास करताना घटनास्थळापासून सीसीटीव्ही कॅमेरे तपासणी करीत सुमारे ४७ किलोमीटर अंतरापर्यंत आरोपीचा माग घेतला तिथून गोपनीय यंत्रणा कार्यान्विंत करुन त्याद्वारे माहिती मिळवत आरोपीस गजाआड करण्यांत लोणंद पोलिसांना यश आले. मुक्यांच्या गुन्ह्यांतील चार वर्षापासून फरारी असलेला व इतर जबरी चोरीच्या गुन्हेयांतील मुख्य आरोपी बापू कल्याण शिंदे (रा. सुरवडी ता. फलटण ) यांस लोणंद पोलिसांनी ताब्यांत घेवुन त्याच्याकडे अधिक चौकशी व सखोल विचारपूस केली असता. त्याने लोणंद खंडाळा पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये गुन्हे केल्यांचे कबूल केले. सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर व त्यांचे सर्व पोलीस सहकारी यांनी या कारवाईमध्ये सहभाग घेतला त्यांच्या या कारवाईबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
