दैनिक चालू वार्ता राजगुरूनगर ता.प्रतिनिधी-मयुरी वाघमारे
==========================
राजगुरूनगर:- राजगुरूनगर ता.खेड जि. पुणे दि:- २१/११/२०२२ आज निवेदन देण्यात आले दि,९ नोव्हेंबर पासून पोलीस भरती साठी आवेदन अर्ज चालू झाले असून या वेळेस शासनाने फक्त कोणतेतरी एकाच घटकासाठी आवेदन अर्ज करण्याची तरतूद केली आहे आम्हाला एकापेक्षा जास्त अर्ज करण्याची परवानगी हवी आहे .महाराष्ट्रातील विध्यार्थी सातत्याने अनेक दिवसांपासून पोलीस भरती चा सराव करत आहे त्या मूलर एका घटकासाठी अर्ज स्वीकारत आसल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अर्ज कोठे भरावा असा संभ्रम निर्माण झाला आहे .त्या मुळे अजूनही अनेक विद्यार्थी अर्ज सादर केलेला नाही .उमेदवारांमध्ये अशी भीती आहे की फक्त एकच संधी दिल्यामुळे त्यांची इतक्या दिवसांची मेहनत व भवितव्य धोक्यात येण्याची शक्यता आहे .२०१९ ची भरती प्रक्रिया २०२१ मध्ये संपन्न झाली होती.त्यामध्ये एकापेक्षा जास्त घटकांमध्ये आवेदन अर्ज सादर केल्यामुळे अनेक उमेदवाची उमेदवारी रद्द करण्यात आली होती.तेव्ह मॅट मध्ये केलेल्या केस मध्ये असा निर्णय देण्यात आला होता, की उमेदवाराला अर्जासाठी मर्यादा घालणे म्हणजे त्याच्या मूलभूत हक्कावर गद्दा आणणे होय .नागरिकानी शिक्षण कोठे घायचे ,नोकरी कोठे करायची याची घटनेने मुभा दिली असण्याची स्पष्ट केली .त्यामुळे एकाच ठिकाणी आवेदन अर्ज करता येत असल्यामुळे उमेदवारांच्या हक्कावर गद्दा आली आहे .त्यामुळे आता महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकानी एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज सादर करता यावे यासाठी आंदोलन सुरू आहे त्यामुळे शासनाने या बाबींचा विचार करून लवकरात लवकर एकापेक्षा जास्त अर्ज करण्याची शासनाने परवानगी द्यावी नाहीतर उमेदवार यांच्या हकांसाठी आंदोलनाच्या भूमिकेत आहे
