दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी आष्टी –
पोलीस उपनिरीक्षक श्री शिवाजी नागवे पोलीस ठाणे आष्टी ता.परतुर यांच्याकडे दिनांक २१ नोव्हेंबर २०२२ रोजी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल मा.भगत शिंग कोश्यारी यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल वादग्रस्त विधान केल्यामुळे महाराष्ट्र राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे, तसेच राज्यपाल कोशारी यांनी या पूर्वी पुणे येथे एका शासकीय कार्यक्रमात महात्मा ज्योतिबा फुले,सावित्रीबाई फुले या महापुरुषांची टिंगल टवाळी करून वादग्रस्त विधान केले होते,काल राज्यपाल कोश्यारी यांनी संभाजीनगर औरंगाबाद येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल वादग्रस्त विधान केल्यामुळे महाराष्ट्रातील सर्व मराठी माणसाचे मंन दुखावले आहे, म्हणून महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल कोशारी यांच्यावर कायदेशीर गुन्हा नोंद करावा कारण सविधान कायद्यासमोर कोणीही मोठे नाही तसेच परमपूज्य डॉ मा.बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेले आहे,अन्याय करणारा पेक्षा ही अन्याय सहन करणारा अधिक दोषी असतो,म्हणून महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल मा.कोशारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बदल अपशब्द वापरून गुन्हा केल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अपेक्षा आहे.महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल मा.भगत शिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले या महापुरुषांच्या विरोधात हेतू पुरस्कार वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण झाला आहे म्हणून कायदेशीर कारवाई करण्यात यावी तक्रार दाखल करते वेळी प्रकाश सोळंके (मनसे जिल्हाध्यक्ष जालना) कृष्णा गोवर्धन सोळंके तालुका अध्यक्ष परतुर, ज्ञानेश्वर केवारे मनविसे जिल्हाध्यक्ष जालनाराहुल आवटे शहराध्यक्ष आष्टी
सवाई राम राठोड विभाग अध्यक्ष आष्टी.
महारुद्र टेकाळे महाराष्ट्र सैनिक
सदाशिव पाटील तालुका सचिव परतुर
तुकाराम कदम
