दैनिक चालु वार्ता औरंगाबाद उपसंपादक- मोहन आखाडे
रविवार दिनांक 20 नोव्हेंबर 2022 दुपारी संभाजीनगर (औरंगाबाद) शहरातील चिकलठाणा पोलिस ठाण्यात कडूबा हजारे नावाचा इसम आला. समोर बसलेल्या अधिकाऱ्याने काय काम आहे? असे विचारले. असता ‘साहेब, मी बायकोला मारून आलाेय, मला अटक करा,’ असे त्याने सांगितले. त्याचे हे बाेलणे ऐकून क्षणभर पाेलिस हैराण झाले.
👉🏻 उपनिरीक्षक बालाजी ढगारे यांनी उपअधीक्षक जयदत्त भवर, सहायक निरीक्षक सुदाम शिरसाट यांना घटना कळवली. दोघेही तत्काळ पोलिस ठाण्यात दाखल झाले. कडुबा घटना सांगत होता, मात्र आम्हाला शहानिशा करण्यासाठी घटनास्थळी जाणे महत्त्वाचे होते. त्यामुळे आम्ही कडुबाला घेऊन तत्काळ गावात पाेहाेचलाे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. कडुबा यांचा लहान मुलाने आई बेशुद्धावस्थेत आढळल्यानंतर त्याने रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.
👉🏻 सुनिता कडूबा हजारे (३८, रा. आपतगाव, ता. औरंगाबाद) असे मृत महिलेचे नाव होते. घटनाक्रम सांगताना कडुबा म्हणाला मी गावात एवढे प्रस्थ तयार केले होते. तिला ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आणले तरी आमचे वाद संपत नव्हते. हे सर्व सहन न झाल्याने मी तिला मारून टाकले, अशी कबुली कडुबाने अधिकाऱ्यांसमोर दिली.
👉🏻 सुनीता या ग्रामपंचायत सदस्य म्हणून बिनविरोध निवडून आल्या होत्या. मात्र, कडुबा व त्यांच्यात सतत वाद हाेत हाेते. त्यामुळे कडुबा यांचे आई-वडील वेगळे राहू लागले. काही महिन्यांपूर्वी लग्न झालेला मोठा मुलगा व सूनदेखील वेगळे झाले. रविवारी सुनीता व कडुबा शेतात होते. तेथे त्यांच्यात पुन्हा वाद झाल्याने कडुबाने सुनीता यांना मारहाण सुरू केली. त्यामुळे त्या पळत सुटल्या. तेव्हा कडुबाने त्यांचा पाठलाग करून त्यांच्याच स्कार्फने गळा आवळून खून केला. त्यानंतर दोन वाजेच्या सुमारास पोलिस ठाण्यात हजर झाला
