दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याने राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे.याअगोदर पण महात्मा फुले,सावित्रीबाई फुले यांचा सुद्धा अपमान राज्यपाल महोदयांनी केला.तर मराठवाडा विद्यापीठातील एका ‘राजकीय’ सोहळ्यात राज्यपालांनी शिवरायांची तुलना नितीन गडकरी यांच्याशी केली.हा विषय तूर्त बाजूला ठेवू,पण‘‘शिवाजी महाराज हे जुनेपुराणे,कालबाह्य झाले आहेत,छत्रपती हे जुन्या जमान्यातील ‘हीरो’ आहेत’’ असे विधान करून महाराष्ट्राच्या अस्मितेवर व स्वाभिमानावर पाय ठेवला असून अंजनगाव सुर्जी येथे शेकडो शिवसैनिकांनी व महिलांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या फोटोला चपला मारून व नारे देऊन तीव्र निषेध शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे) वतीने व्यक्त करण्यात आला.शिवरायांचा अपमान करण्याच्या पटकथेत भाजप सुद्धा सहभागी आहे.तसेच शिवरायांचा अपमान करणार्यांनी महाराष्ट्रासमोर नाक घासून माफी मागावीच लागेल.उद्धव ठाकरे गट अमरावती जिल्हा पदाधिकारी,महीला पदाधिकारी,अंजनगाव सुर्जी तालुका व शहर पदाधिकारी शिवसैनिकांनी यावेळी म्हटले.
