
दैनिक चालू वार्ता वृत्तसेवा-
जीवनातील एखादी चुक आपल्या जीवनावर बेतावी अशी वेळ का येते आहे आणि आपल्या जीवा पेक्षा या सृष्टीवर महत्वाचं असं काहीच नाही हे आपण नेमक कसं काय विसरतो .आई वडील,भाऊ , बहीण , नातेवाईक, आप्तेष्ट हि सगळी मंडळी आपल्याला काही क्षणात परकी कशी वाटते .आणि अनोळखी व्यक्तीशी आपण एवढ्या लवकर एवढे घनिष्ठ होऊन जीवापाड विश्वास कसा काय ठेवतो.याच मुख्य कारण काय आहे. आपली मती कुठे मारली जाते . आणि आपण आपलं वाटोळं करून घेतो . आपली सांस्कृतिक मुल्य एवढे दुबळे आहेत का कि आपण पाण्यात वाहत जाणारया ओंडक्या प्रमाणे जीवनाच्या वाटेवर वाहत जातो . आणि आपलं जीवनावरील नियंत्रण संपुष्टात येत आणि मग आपल्याला अन् अपेक्षित घटनेला सामोरे जावे लागते आपले संस्कार आणि संस्कृती हि जीवनातील सर्व श्रेष्ठ जीवन मुल्य आहेत . त्याच्या पेक्षा जीवनात काहीच मोठं नाही श्रेष्ठ नाही हि खुणगठ आपल्या मनाशी बांधली तर आपल्या जीवनात कोणाताही अनर्थ घडणार नाही .आपण आपली सांस्कृतिक जर मुल्य जोपासली तर हृदय हेलावून टाकणार्या घटना घडामोडी घडणार नाहीत .हे अगदी अगदी सरळ साधं सोपं गणित आहे .टाळी एक हताने वाजत नाही . मुळात असंगाशी संग झाला तर सुयोग्य परिणाम निश्चितच येणार नाहीत . हे ञिकाल सत्य आहे.सध्याच्या काळात सनसनाटी निर्माण करतील अशा काही अप्रिय ह्रदय हेलावणार्या घटना घडल्यानंतरच आपण खडबडून जागे होतो . आणि तेवढ्याच काळात आपण त्याची चर्चा करतो व नंतर विसरून जातो . मुळात अशा अप्रिय घटना घडामोडी का घडतात तर आपण आपली सांस्कृतिक मुल्य पायदळी तुडवून मर्यादा उल्लंघन करतो.आपल्या धर्म शास्त्रानुसार संस्कृती नुसार सगळ्यात महत्वाची शिकावण जी रामायणाचा बोध आहे .ती म्हणजे जर आपण मर्यादा उल्लंघन केली तर मग आपला बचाव कोणीही करू शकत नाही.महणुन आपण मर्यादा पालन केले पाहिजे.जर आपण मर्यादा पालन केले तर निसर्ग आपलं संरक्षण करतो . म्हणून आपल्या जीवनात आपण सांस्कृतिक मुल्य जर जोपासली वृद्धिंगत केली तर आज आपण ज्या काही वेगवेगळ्या हृदय हेलावून टाकणार्या घटना पाहत आहोत याला नक्कीच येणाऱ्या काळात आळा बसल्यशिवाय राहणार नाही. आणि भविष्यात असे प्रकार घडणार नाहीत. जीवनात अनेक प्रसंग भावनात्मक घडामोडी घडत असतात . आणि वेगवेगळ्या पद्धतीने आपण अनेकांच्या प्रभावात जात असतो . त्यामध्ये वैचारिक,भावनिक, शारीरीक प्रभाव ,हे जितके उत्कृष्ट चांगले तितकेच विघातक , वाईट , आणि आपल्या जीवनावर प्रतिकुल परिणाम करणारे असतात . अशा वेळी वेगवेगळ्या भावनात्मक गुंतागुती मधुन आपल्याला आपलं जीवन सुरक्षित करण्यासाठी आपण खूप सजग आणि जागृत राहण्याची आवश्यकता आहे. जीवनात तरुण वय आयुष्य घडविण्यासाठी महत्वाचं आहे याच कालावधी मध्ये आपलं भविष्य सुरक्षित करता आल पाहिजे पण नेमकं याच वयात मुलं भरकटतात आणि मग दिशाहीन होऊन होत्याच नव्हत होऊन जातं आणि आयुष्य बरबाद होऊन जातं . वास्तविक आपण सदैव सज्जग, जागृत आणि आपल्या सांस्कृतिक मुल्य प्रति एकनिष्ठ राहिलो तर मग मात्र आपल्या जीवनात कोणाताही अनर्थ घडणार आहे.चुकीची घटना घडणार नाही एवढा संयम आपल्यावर आपला स्वतःचा असला पाहिजे . शेवटी आपणं स्वतः आपल्या जीवनाचे शिल्पकार असतोच आणि आपल्या चांगल्या वाईटाला सुद्धा आपण स्वतः आपण जबाबदार असतो . आणि अशा पद्धतीने घडणाऱ्या घटना घडामोडी यांना कायमचा आळा घालण्यासाठी आपली सांस्कृतिक मुल्य आपण जोपासली व वृद्धिंगत करण्याची आवश्यकता आहे.
गणेश खाडे
संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य तथा वंजारी समाज ईतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर अध्यात्मिक मार्गदर्शक 9011634301