
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी आर्णी-श्री, रमेश राठोड
@@@@@@@@@@@@@@@@
आर्णी निम्न पैनगंगा ह्या मोठ्या धरण्याऐवजी पैनगंगा नदी पात्रात साखळी बंधारे बांधून सिंचनाची व्यवस्था करावी तसेच निम्न पैनगंगा प्रकल्पाची अकरा एक कलम लागू करू नये या विषयीचे निवेदन निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समितीने जिल्हा प्रशासनाकडे सादर केले आहे.
निम्न पैनगंगा धरणाच्या १८ गावातील पुनर्वसनाच्या पहिल्या टप्प्याचे नियोजन शासन स्तरावर चालू असून कलम ११ एक लागू करण्याच्या हालचाली सुरू आहे , ग्रामसभेची पूर्वपरवानगी घ्यावी असे भूसंपादन कायद्यात स्पष्ट केलेले आहे, शासनाने व त्यांच्या अधिकारी वर्गानेही शासकीय नियमांची पायमल्ली करू नये तसेच
आदिवासी क्षेत्रातील जमिनीचे भूसंपादन करू नये आणि कायद्याचे उल्लंघन थांबावे अशी मागणी निम्न पैनगंगा धरणविरोधी संघर्ष समितीने मा. जिल्हाधिकारी श्री. अमोल येडगे यांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्याशी चर्चा करून व याबाबतचे निवेदन दिले आहे.
निवेदन देताना समितीचे अध्यक्ष श्री. प्रल्हाद पाटील जगताप , यवतमाळ जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष श्री. मुबारक तवर , आर्णी पंचायत समितीचे माजी सभापती श्री. विजय पाटील राऊत , ऍड. बालाजीराव येरावार , प्रल्हादराव गावंडे सर , सावळी सदोबा चे माजी पोलीस पाटील मिलिंद पाटील शिंदे, प्रमोद बनसोड ,बालाजी ठाकरे , अमोल भेदूरकर , विनोद जैस्वाल इत्यादी मंडळी उपस्थित होती.