
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी- संतोष मनधरणे.
देगलूर:देगलूर (प्रतिनिधी) – २०१२ पासून राज्यात गुटखाबंदीचा नियम असताना सुद्धा राजरोसपणे गुटका विकला जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे अन्य औषध प्रशासनाला याची कल्पनाच नाही यात कितपत सत्य असावे. आज आपण कोणत्याही पान टपरीवर उभे राहा उत्तर मिळून जाईल. कारण मी नाही त्यातली कडी लाव आतली अशी भूमिका अन्न व औषध प्रशासन तथा मरखेल पोलिसांचे दिसत आहे. कारण कर्नाटकातून सर्रासपणे गुटखा महाराष्ट्रात आणला जातो जे मरखेल पोलिसांच्या अखत्यारीतील असलेले हनेगाव येथून आणला जात आहे. जर
तुम्ही म्हणाल की आम्ही वाहन तपासणी करूनच महाराष्ट्रात वाहनांना प्रवेश देतो. तर मग हा गुटखा सहजपणे मिळतोच कसा? सहजपणे मिळत असेल तर कोणत्या स्वरूपाची कार्यवाही अन्न व औषध प्रशासन विभागाकडून होते. या मागचे गौड बंगाल लोकांना समजेल काय ? संबंधित दोन्ही प्रशासनाचे मात्र यातून अकार्यक्षमतेचे दर्शन होताना दिसत आहे.
जवळच असलेल्या मुखेड तालुक्यातील मुक्रामाबाद पोलीस स्टेशनलाही कर्नाटकाची सीमा लागते. संबंधित पोलीस स्टेशनला गुटखाबंदी विषयी तक्रार जाताच तेथील अधिकाऱ्यांनी कडेकोटबंदोबस्त व सलग कार्यवाहीने गुटखा विक्रीवर आळा घातला.
केल्याने होते रे केल्याची पाहिजे असेच कार्य मुक्रमाबाद पोलीस स्टेशनने दाखवून दिले. मग मरखेल पोलिसांना हे का जमलेनसावे? व तसेच जनतेत चर्चा आहे की अनेक ठिकाणी पोलीस गुटखा वाहतुकीकडे दुर्लक्ष करतात कारण त्यांना त्यातून आर्थिक लाभ होतो हे सत्य तर नाही ना ? सत्य असेल तर कोणत्याही स्वरूपाची कार्यवाही होणार नाही हे स्पष्ट. आणि जर आर्थिक लाभ होत नसेल तर कार्यवाही मात्र होणारच !
मग अन्न औषध प्रशासन तथा मरखेल पोलीस कोणत्या स्वरूपाची कार्यवाही करून गुटख्यापासून होणाऱ्या कर्करोगाला आळा घालून जनतेला वाचवतात व जनतेला कल्याणकारी जीवन जगण्यास हातभार लावतात. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.